विशेष प्रतिनिधी
मुंबई : Indian Army पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाईनंतर वापरलेली युद्धसामग्री भरून काढण्यासाठी भारतीय लष्कराने तातडीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या खरेदीमध्ये ड्रोन (loitering munitions), ड्रोन विरोधी प्रणाली (Counter-UAV systems), टँकविरोधी क्षेपणास्त्रं (Anti-Tank Guided Missiles) आणि तोफांसाठी लागणारी दारूगोळा सामग्री (Artillery Ammunition) यांचा समावेश आहे.Indian Army
संरक्षण मंत्रालयाच्या नियमानुसार, तीनही सैन्यदलांना एकत्रितपणे संरक्षण आधुनिकीकरणासाठीच्या अंदाजपत्रकाच्या १५% पर्यंतची तातडीची खरेदी करण्याचा अधिकार आहे. चालू वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात या आधुनिकीकरणासाठी ₹1.6 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे तातडीच्या खरेदीची कमाल मर्यादा ₹24,000 कोटी एवढी आहे.
प्रत्यक्षात खर्च होणारी रक्कम यापेक्षा खूपच कमी असण्याची शक्यता आहे, कारण या खरेदीसाठी केवळ एका वर्षाच्या आत डिलिव्हरी होणाऱ्या ऑर्डरच दिल्या जाऊ शकतात.
तिन्ही दलांच्या उपप्रमुखांना एका करारासाठी ₹300 कोटींच्या खरेदीस मान्यता देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, जर खरेदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून करायची असेल, तर त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी आवश्यक राहील.
२०१६ मधील उरी हल्ल्यानंतर सरकारने लष्कराला तातडीच्या खरेदीचे अधिकार दिले होते आणि त्यानंतर आतापर्यंत अशा पाच फेऱ्या पार पडल्या आहेत. सध्या सुरू असलेली सहावी फेरी आहे. यामध्ये करार ४० दिवसांत अंतिम करावा लागतो आणि डिलिव्हरी एका वर्षाच्या आत व्हावी लागते.
या फेरीत कॅमिकाझी ड्रोन, एआय मार्गदर्शित दारूगोळा (AI guided munitions), विमानविरोधी क्षेपणास्त्रे यांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर देण्यात येणार आहेत. संरक्षण उद्योगाकडून ₹40,000 कोटींच्या ऑर्डरची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Indian Army begins urgent procurement of military equipment
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर