विशेष प्रतिनिधी
पुणे : NCP’s Rajendra Hagavane राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास ही घटना मुळशीतील भुकूम येथे घडली. याप्रकरणी बावधन पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.NCP’s Rajendra Hagavane
याप्रकरणी पती शशांक राजेंद्र हगवणे, सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (वय ५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी पाचच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्या केली. काही वेळानंतर पती शशांक हगवणे यांनी दरवाजा ठोठावला. पत्नीने दरवाजा न उघडल्याने शशांक यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर ही गंभीर घटना समोर आली. शशांक यांनी तातडीने पत्नीला खासगी रुग्णालयात नेले. आधी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वैष्णवीला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे काही व्रण आढळले आहेत. याप्रकरणी बावधन पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. ५१ तोळे सोने, आलिशान चारचाकी, चांदीची भांडी तसेच सुसगाव येथील महागड्या मंगलकार्यालयात लग्न लावून देण्याच्या बोलीवर दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींनी वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नात चांदीची भांडी दिली नाही याचा राग धरून सासरची मंडळी तिच्याशी घालून पाडून बोलत असे. तसेच तिच्या सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याआधीही आत्महत्येचा प्रयत्न
ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गरोदर राहिली. त्यानंतर शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही असे म्हणत त्याने तिला मारहाण केली. तसेच तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर सासरच्या छळाला कंटाळून आणि सतत होणारी हुंड्याची मागणी यामुळे तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला औंध येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिचे सासरच्या मंडळींपैकी कोणीही तिला बघायला आले नाही. ती बरी झाल्यावर तिला सासरी पाठवून देण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर शशांक यांनी फिर्यादी यांच्याकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता शशांकने वैष्णवीला धमकावविल. तसेच ‘आम्ही भुकूम मधील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहोत. आमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही दोन कोटी देवू शकत नाही. तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही’, असे म्हणत मारहाण केली. तसेच तिला माहेरी आणून सोडले, असे फिर्यादीत नोंदविण्यात आले आहे.
सासू आणि नणंदेकडून मारहाण
त्यानंतर माहेरच्यांनी तिला परत सासरी सोडले. किरकोळ कारणावरून मार्च २०२५ मध्ये सासू लता आणि नणंद करिश्मा यांनी वैष्णवीला शिवीगाळ करीत मारहाण केली. तिच्या तोंडावर थुंकले. तसेच चारचाकीमधून तिला वाकड येथे आणून सोडले. येताना सासू आणि नणंदेने तिला कारमध्ये मारहाण केली. तसेच वैष्णवीने ‘कारमधून उडी मारेन’ असे बोलल्यावर त्यांनी मारहाण करणे बंद केले. घडलेला प्रकार वैष्णवीने माहेरी सांगितल्याचे, फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शुक्रवारी (१६ मे) शशांकने फिर्यादीच्या नातेवाईकाला वैष्णवीसोबत भांडण झाले असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता त्याने वैष्णवीने गळफास घेतला असून तिला खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी आपल्या नातेवाईकासह रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी वैष्णवीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच वैष्णवीच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खुणा तसेच व्रण दिसले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपी शशांक आणि राजेंद्र यांना सांगि तले असता त्यांनी ‘मारून टाकले तुझ्या पोरीला’ असे म्हटल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे.
NCP’s Rajendra Hagavane booked for daughter-in-law’s suicide, commits suicide by hanging
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर