ज्योती मल्होत्राप्रमाणेच आयएफएस अधिकारीही बनली होती प्रेमाची शिकार, माधुरी गुप्ता प्रकरणाची आठवण ताजी

ज्योती मल्होत्राप्रमाणेच आयएफएस अधिकारीही बनली होती प्रेमाची शिकार, माधुरी गुप्ता प्रकरणाची आठवण ताजी

Jyoti Malhotra

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: प्रसिद्ध ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जणांना पाकिस्तानसाठी संवेदनशील माहिती गुप्तपणे पाठवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून हेरगिरी करून घेतली. या प्रकरणाने 2010 मधील माधुरी गुप्ता हेरगिरी प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. Jyoti Malhotra

ज्योतीचा थेट संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटांशी असल्याचे उघड झाले असून, तिची पाकमध्ये जाण्याची व्यवस्था देखील आयएसआयनेच केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एजंट एहसान उल रहीम उर्फ दानिशशी ‘डिप्लोमॅट’च्या वेशात आयएसआयचा हेर असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला २४ तासांत भारतातून हद्दपार करण्यात आले.

असाच प्रकार एप्रिल २०१० मध्ये उघडकीस आला होता. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या मधुरी गुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर दोन वर्षातच हे प्रकरण समोर आल्यामुळे, भारत-पाक संबंध आधीच तणावात असताना हे आणखी धक्कादायक ठरले.

मधुरी गुप्ता या आयएफएस (IFS Grade B) अधिकारी होत्या. त्यांनी मलेशिया, क्रोएशिया, इराक यासारख्या देशांत काम केले होते. इस्लामाबादमध्ये त्या ‘प्रेस अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सेकंड सेक्रेटरी’ म्हणून नियुक्त होत्या. उर्दूवर प्रभुत्व असल्यामुळे त्या पाकिस्तानी मीडियाचे विश्लेषण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अहवाल तयार करायच्या.

2009 च्या उत्तरार्धातच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या वर्तनात संशयास्पद बाबींची नोंद घेण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी पत्रकार व अधिकाऱ्यांशी त्यांचे अनावश्यक संबंध वाढले होते. गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचालींवर गुप्त नजर ठेवली आणि तिच्यावर ‘फेक माहिती’चा प्रयोग केला. ती माहिती पाककडे गेल्याचे लक्षात येताच, गुप्ता यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

गुप्ता यांच्या ईमेल खात्यावरून भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची माहिती, त्यांच्या हालचाली, गुप्त सल्ला, रॉ (R&AW) एजंट्सच्या ओळखी यासारखी माहिती पाकिस्तानला पाठवली गेल्याचे पुरावे सापडले. मुख्य आरोपींमध्ये ‘जमशेद’ (उर्फ जिम) आणि मुबशर राणा यांचा समावेश होता. ते आयएसआयसाठी काम करत होते. त्यांच्याशी मधुरी गुप्ता यांचे प्रेमाचे संबंधही होते, असा आरोप आहे.

सरकारी बाजूने हा प्रकार आयएसआयच्या ‘हनीट्रॅप’चा भाग असल्याचे सांगितले. ‘जिम’ नावाच्या एजंटने प्रेमाचे नाटक करत मधुरी गुप्ताकडून माहिती मिळवली, असा आरोप आहे. गुप्ता यांनी स्वतः एका ईमेलमध्ये “जिम मला कुत्र्यासारखं वागवतो” असे लिहिले होते. मात्र, बचाव पक्षाने हा सर्व प्रकार एका अंतर्गत वादाचा परिणाम असल्याचे सांगितले. गुप्ता यांना उच्चस्तरीय गुप्त माहिती मिळण्याचा अधिकार नव्हता आणि त्या केवळ मीडियाचे विश्लेषण करत होत्या, असे त्यांनी कोर्टात सांगितले. काहींनी तर हे R&AW व IB यांच्यातील अंतर्गत स्पर्धेचे प्रकरण असल्याचेही म्हटले.

गुप्ता यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120(B) आणि ‘Official Secrets Act’ च्या कलम 3(1)(c) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला. अधिकृतरित्या त्यांना 3 वर्षांची शिक्षा झाली. मात्र, सरकारने अधिक कठोर शिक्षा (14 वर्षांपर्यंत) व्हावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Like Jyoti Malhotra, an IFS officer also became a victim of love, the memory of the Madhuri Gupta case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023