विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी: काँग्रेस नेते गौरव गोगोई आयएसआयच्या आमंत्रणावर पाकिस्तानला गेले होते. भारतात परतल्यावर त्यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीचा विरोध केला होता,” असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. जर माझ्या एकाही शब्दाचा खोटेपणा सिद्ध झाला, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन असेही ते म्हणाले Gaurav Gogoi
“मी हे पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतो आहे की गौरव गोगोई पर्यटनासाठी नव्हे, तर प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत,” असे मुख्यमंत्री सरमा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरमा यांनी सांगितले की, “गोगोई हे पाकिस्तान सरकारच्या थेट निमंत्रणावर गेले होते आणि ही गोष्ट अत्यंत धोकादायक होती. हे निमंत्रण परराष्ट्र व्यवहार किंवा सांस्कृतिक खात्याचं नव्हतं, तर थेट गृहमंत्रालयाचं होतं. गृहमंत्रालय जेव्हा कुणाला बोलावते, तेव्हा पर्यटनासाठी नाही तर प्रशिक्षणासाठीच असते.
मुख्यमंत्री सरमा यांनी हेही स्पष्ट केलं की, गौरव गोगोईंच्या या कृतींचे पुरावे सरकारकडे आहेत आणि यावरून ते कुठेही पळू शकणार नाहीत. आमच्याकडे संपूर्ण माहिती आहे, फक्त त्या कागदपत्रांची अधिकृत खात्री करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आम्ही १० सप्टेंबरपर्यंत हे सर्व पुरावे जनतेसमोर आणू. आपण कुणाकडेही विचारणा करू नये, कारण ती अंतिम तारीख आहे. आम्ही वकीलांमार्फत नोटीस पाठवणार आहोत आणि मग दूतावासामार्फत अधिकृत दस्तऐवज प्राप्त करू,” असेही त्यांनी सांगितले.
एका जाहीर सभेत बोलताना सरमा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोईंवर थेट निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “”
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आसाममध्ये राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र भाजप नेत्यांनी या आरोपाचे समर्थन करत काँग्रेसवर राष्ट्रीय सुरक्षेविषयी दुहेरी भूमिकेचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात गोगोई यांच्या पाक दौऱ्याचा संदर्भ देत असेही सांगितले की, “पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि काही काँग्रेस नेत्यांमध्ये संबंध असल्याचे पुरावे लवकरच समोर आणले जातील.”
राफेल विमान खरेदीच्या निर्णयावर काँग्रेसने सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे उदाहरण देत, सरमा म्हणाले की, “जेव्हा देशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज होती, तेव्हा काही लोक परदेशी एजन्सींच्या दबावाखाली राष्ट्रविरोधी भूमिका घेत होते.”
हा आरोप खरा की खोटा, हे लवकरच स्पष्ट होणार असले तरी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतच राजीनाम्याचं आव्हान दिल्यामुळे याला गंभीर राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.
Assam Chief Minister Gaurav Gogoi accused of going to Pakistan on ISI’s invitation and opposing Rafale on arrival
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर