विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापर्यंत केवळ महानगरांमध्येच ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. या प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालये वगळण्यात आली आहेत. Class 11
राज्यात यंदा अकरावीच्या प्रवेशांची एकूण क्षमता ही २० लाख ४३ हजार २५४ इतकी आहे. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ८ लाख ५२ हजार २०६ जागांचा समावेश आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी ही येत्या सोमवारपासून (दि.१९ मे) सुरू होणार आहे. या फेरीतील पहिले दोन दिवस म्हणजेच १९ व २० मे हे प्रवेश नोंदणी सरावासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात येत्या बुधवारपासून (दि.२१ मे) प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येणार आहे. Class 11
राज्याच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दि.१९ मे सकाळी ११ वाजल्यापासून दि. २० मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र (Practice Session) ठेवण्यात आले आहे. हे सराव सत्र केवळ सरावासाठी असणार आहे. यामध्ये भरलेली माहिती २० मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटविली जाणार आहे. दि. २१ मे रोजी सकाळी ११वाजल्यापासून प्रत्यक्षात नोंदणी सुरू केली जाणार आहे.
ही नोंदणी येत्या २८ मे २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना किमान १ ते कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. व्यवस्थापन, इन-हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी प्रत्येक फेरीपूर्वी “Consent” आवश्यक आहे.
पहिल्या फेरीचे उर्वरित वेळापत्रक पुढीलप्रमाणे
– तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे — दि. ३० मे, सकाळी ११ वाजता.
– हरकती व दुरूस्ती करणे — दि. ३० मे ते १ जून २०२५ सायंकाळी ४ वाजेपर्यंत
– हरकती व दुरुस्ती प्रक्रिया लॉगीनद्वारे — दि. ३ जून २०२५ सायंकाळी वाजेपर्यंत
– अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे — दि. ५ जून २०२५
– गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप करणे (शून्य फेरी) — दि. ६ जून २०२५ सकाळी १० वाजता
– वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर टाकणे — दि. ६ जून सकाळी ११ वाजता.
– प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी करणे (पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य) — दि. ६ जून सकाळी ११ वाजल्यापासून १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत
दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर करणे —- दि. १४ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत.
शाखा आणि विभागनिहाय प्रवेश क्षमता
(Intake Capacity)
पुणे विभाग
एकूण जागा — ३,७५,८४६
कला — १,०३,७००५
वाणिज्य — १,०१,९७१
विज्ञान — १,७०,१७०
अमरावती विभाग
एकूण जागा — १,८६,४७५
कला शाखा — ८०,७४०
वाणिज्य — २४,३४०
विज्ञान —८१,३९५
छत्रपती संभाजीनगर
एकूण जागा — २,६६,७५०
कला — १,११,१६५
वाणिज्य — ४२,६१५
विज्ञान — १,१२,६७०
कोल्हापूर
एकूण जागा — १,९३,२७८
कला — ६४,५७२
वाणिज्य —४८,४६६
विज्ञान — ८०,२४०
लातूर विभाग
एकूण जागा — १,३७,५५०
कला — ५२,८६०
वाणिज्य — २१,२६०
विज्ञान — ६३,४३०
मुंबई विभाग
एकूण जागा — ४,६१,६४०
कला — २२,९५५
वाणिज्य — २,७२,९३०
विज्ञान — १,६०,७१५
नागपूर
एकूण जागा — २,१४,३९५
कला — ७६,३९५
वाणिज्य — ३८,८३०
विज्ञान — ९९,८७०
नाशिक विभाग
एकूण जागा — २,०७,३२०
कला — ८३,०००
वाणिज्य —३७,०२०
विज्ञान — ८६,७३०
महाराष्ट्रातील एकूण प्रवेश क्षमता
एकूण प्रवेश क्षमता —- २०,४३,२५४
विज्ञान शाखा — ८,५२,२०६
वाणिज्य शाखा — ५,४०,३१२
कला शाखा — ६,५०,६८२
पालकांनो, हे लक्षात ठेवा
– कॅप (CAP) किंवा कोटामार्फत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाणार.
– एकदा विद्यार्थ्यांने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येणार.
– प्रवेश नोंदणी शुल्क डिजिटलमाध्यमातूनच स्विकारला जाणार
– सर्वानी प्रवेशाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक.
– व्यवस्थापन कोटा इन-हाऊस किंवा अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश ६ जून २०२५ पासून सुरू होणार
अकरावी प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा
www.mahafyjcadmissions.in
किंवा
support@mahafyjcadmissions.in
Online centralized admission process for class 11 in the state from today
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर