विशेष प्रतिनिधी
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला.
मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना आज पहाटे हा अपघात झाला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातातील मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) यांचा समावेश आहे. दोन कुटुंबातील हे लोक मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाले होते.
Family on way to funeral suffers tragedy, five killed as car falls 100 feet deep
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर