विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Covid-19 कोविड-19 चा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या नवीन लाटेने चिंता वाढवली आहे. सिंगापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तसेच, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.Covid-19
ही वाढ मुख्यत्वेकरून ओमिक्रॉनच्या नवीन सबव्हेरियंट्समुळे – विशेषतः JN.1 आणि त्याच्या LF.7 या उपप्रकारांमुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सिंगापूरमध्ये मे 2025 च्या सुरुवातीसच रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊन ती 14,000 च्या पुढे गेली. एप्रिलच्या अखेरीस ही संख्या 11,100 होती. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढली असली तरी, आयसीयूमधील रुग्णसंख्येत किंचित घट दिसून आली आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, सध्याचे व्हेरियंट्स फारशे गंभीर नाहीत, परंतु अधिक संक्रामक आहेत. या लाटेमागे जनतेच्या प्रतिकारशक्तीतील घट हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. LF.7 आणि NB.1.8 हे दोन्ही JN.1 चे उपप्रकार सध्या प्रमुख व्हेरियंट्स मानले जात आहेत.
JN.1 हा ओमिक्रॉन BA.2.86 चा एक सबव्हेरियंट असून त्याची ओळख सर्वप्रथम ऑगस्ट 2023 मध्ये झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये याला ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ असा दर्जा दिला होता. या व्हेरियंटमध्ये सुमारे 30 उत्परिवर्तनं आहेत, जी रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतात. मात्र, BA.2.86 वर्षअखेरीस SARS-CoV-2 चा प्रमुख प्रकार बनू शकला नाही.
Covid-19 threat, two die in Mumbai, actress Shilpa Shirodkar tests positive
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर