विशेष प्रतिनिधी
जालना : राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आल्या आहेत. म्हणून अजित पवारांनी छगन भुजबळांना तात्पुरतं नादी लावले असेल असे मला वाटते. मराठा आरक्षणाचे मारेकरी जर अजित पवारांकडून सत्तेत जाणीवपूर्वक घेतले जाणार असतील तर मराठ्यांना एकत्र राहण्याची गरज आहे, असा हल्लाबोल मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागली आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
जातीयवादी लोकांना पुन्हा पदं देऊन अजित पवार मोठी चूक करत आहेत, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ यांना सध्या मंत्रिपदाचा आनंद वाटत असेल, पण लवकरच त्यावर विरजण पडेल. त्यांना ही संधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपुरती दिली आहे. छगन भुजबळ यांनी शपथ घेतली की नाही, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. हे त्यांचा पक्ष आणि अंतर्गत राजकारण आहे.
अजित पवार यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील मराठा मुलांना या आरक्षणामुळे नोकरी लागणार आहे, शिक्षण मिळणार आहे. नेमक्या त्याच सुविधा मिळू नये यासाठी भुजबळ नेहमी विरोध करतात. जातीयवादी लोक पोसायचा प्रकार नेमका काय आहे? त्यांना मोठ्या परिणामांना आता सामोरे जावे लागणार आहे. भुजबळांना मंत्रिपद दिले म्हणून आम्ही म्हणत नाही. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम केवळ अजित पवार करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे म्हणाले की, हे सर्व नाटकं देवेंद्र फडणवीस यांचे आहे. छगन भुजबळांना मंत्रीपद द्या असे त्यांनीच सांगितले असेल. ओबीसी मतदानासाठी ही शाळा असू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना ओएसडी दिले आहेत, यांचे काहीच चालत नाही.मराठा नेते संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. हे सर्व आमदारांना कळायला हवे.
As elections approach, Bhujbal gets a ministerial post, Manoj Jarange Patil attacks him
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर