विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला असून, भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल दाखवत शत्रू आणि जागतिक समुदायाला आपली लष्करी ताकद दाखवली आहे. मात्र, विरोधी पक्षांचे क्षुद्र राजकारण कायम आहे. राहुल गांधी, ज्यांना राष्ट्रीय हितापेक्षा राजकीय महत्वकांक्षा पोटी केलेली विधाने पाकिस्तानच्या हातातील हत्यार बनले आहेत.
पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर अपमानित करत भारताने आपल्या सामरिक क्षमतेचे प्रभावी प्रदर्शन केले. मात्र, याच वेळी देशांतर्गत राजकारणात काँग्रेससारख्या विरोधकांनी आपल्या अप्रामाणिक वर्तनातून पाकिस्तानच्या दुष्प्रचाराला पोषक वातावरण निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे.
राहुल गांधींनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा एक व्हिडीओ शेअर करत दावा केला की, जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानी लष्कराला माहिती दिली होती. त्यांनी भारतीय हवाई दलाने किती विमाने गमावली याबाबतही प्रश्न उपस्थित केले.विशेष म्हणजे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने हा व्हिडीओ बनावट असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. भारत सरकारने भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान सोशल मीडियावर पसरलेले अनेक बनावट व्हिडीओ आणि फोटो खोडून काढली आहेत.
जयशंकर यांनी असे म्हटले होते की ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला की, आम्ही दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करत आहोत, लष्करावर नाही. त्यामुळे लष्कराला यात हस्तक्षेप न करण्याचा पर्याय होता. त्यांनी हा सल्ला नाकारला. त्यांनी कधीही ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती दिल्याचे म्हटले नाही. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी आणि PIB ने पुष्टी केलेल्या टाइमलाइननुसार, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संदेश देण्यात आला. शिवाय, राहुल गांधी यांनी भारताने विमाने गमावल्याचा खोटा दावा पुनरुच्चार केला. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी विमाने पाडल्याच्या आरोपावर पुरावा मागितल्यावर “सोशल मीडियावर सर्वत्र आहे” असे लाजिरवाणे विधान तरीही राहुल गांधी सत्याकडे दुर्लक्ष करत खोटा प्रचार करत आहेत.
काँग्रेसने १९ मे रोजी जयशंकर यांच्यावरील हल्ले तीव्र केले, ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीला भारत-पाकिस्तान परराष्ट्र धोरणाबाबत माहिती दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयशंकर यांचे मौन “घातक” असल्याचे म्हटले आणि पुन्हा प्रश्न केला की, पाकिस्तानला माहिती असल्याने भारताने किती विमाने गमावली? त्यांनी याला गुन्हा ठरवत देशाला सत्य जाणण्याचा हक्क असल्याचे म्हटले. अपेक्षेप्रमाणे, पाकिस्तानच्या माध्यमांनी त्यांच्या विधानांचा फायदा घेत ऑपरेशन सिंदूरला भारताचा पराभव म्हणून सांगायला सुरुवात केली.
काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेत या आरोपांची पुनरावृत्ती केली. त्यांनी जयशंकर यांच्या विधानांमुळे दहशतवादी पळून जाण्यास मदत झाली असावी, असा आरोप केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना याचे उत्तर द्यावे लागेल. भारताने किती विमाने गमावली? देशाला किती नुकसान झाले? किती दहशतवादी पळाले?” असे त्यांनी विचारले. राजकीय चिखलफेक पुढे नेत त्यांनी म्हटले, “पाकिस्तानला माहिती देण्याचा अर्थ काय? तुम्ही दहशतवाद्यांवर इतका विश्वास ठेवता की, माहिती दिल्यावर ते तिथेच थांबतील? त्यांच्याशी तुमचे नाते काय? याला रणनीती म्हणतात? गावच्या भाषेत याला ‘मुखबिरी’ म्हणतात. हा हेरगिरी, गुन्हा आणि विश्वासघात आहे.”
खेरा यांनी तर षड्यंत्र सिद्धांत मांडत म्हटले, “या मुखबिरीमुळे अझहर मसूद आणि हाफिज सईद जिवंत सुटले का? देशाला हे जाणण्याचा हक्क नाही का की, तुम्ही अझहर मसूदला वाचवले? याच व्यक्तीला यापूर्वी कंधारमध्ये वाचवले गेले होते. दुसऱ्यांदा त्याला वाचवण्याचा कट का रचला गेला? जर आम्ही पाकिस्तानला आधीच सावध केले असेल, तर अझहर मसूद आणि हाफिज सईद यांसारखे दहशतवादी पळाले असतीलच.”
अमेरिका आणि चीनकडे पंतप्रधान मोदी, जयशंकर आणि भाजपच्या इतर नेत्यांबाबत काही तडजोडीची माहिती असावी, कारण त्यांचा या देशांशी व्यवहार करताना संकोच दिसतो, असा दावाही त्यांनी केला
काँग्रेसचे क्षुद्र राजकारण केवळ भारताच्या लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही, तर पाकिस्तानच्या कटकारस्थानांमुळे ऑपरेशन सिंदूरची गरज भासली हे जगाला सांगण्याच्या प्रयत्नांवरही आहे. मोदी सरकारने पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी आणि भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यावर जागतिक व्यासपीठावर भारताची बाजू मांडण्यासाठी करण्यासाठी परदेशात सात शिष्टमंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एकाचे नेतृत्व शशी थरूर करतील, यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली.काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, खासदार गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन आणि अमरिंदर सिंग ब्रार यांची नावे सुचवली होती.
मात्र, सरकारने यापैकी फक्त आनंद शर्मा यांचे नाव स्वीकारले आणि शशी थरूर, मनीष तिवारी आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुरशीद यांच्यासह काँग्रेसच्या यादीत नसलेल्या व्यक्तींची निवड केली. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास, प्रखर राष्ट्राभिमान आणि संवाद साधण्याची हातोटी यामुळे थरूर यांची निवड करण्यात आली.
मात्र, काँग्रेसने याला राजकीय अभिमानाचा मुद्दा बनवत सरकारवर “प्रामाणिकपणाचा अभाव” आणि “स्वस्त राजकारण” असा आरोप केला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आरोप केला, “ऑपरेशन सिंदूरचे राजकारण केले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात वेळा दावा केला की, त्यांच्या मध्यस्थीमुळे संघर्ष कमी झाला. तरीही पंतप्रधान मोदी यांनी याला उत्तर दिले नाही. परराष्ट्रमंत्री गप्प आहेत.”
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात क्रांतिकारी बदल दाखवून दिले. मात्र, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे खोटे आरोप आणि षड्यंत्र सिद्धांत देशाच्या एकतेला आणि लष्करी यशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजुटीने उभे राहण्याची गरज असताना, विरोधकांचे क्षुद्र राजकारण देशाच्या हिताला बाधा आणत आहे, असा आरोप होत आहे.
Congress political mudslinging on Operation Sindoor’s landslide victory : Rahul gandhi
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझ