विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : नक्षलवादाविरुद्ध राज्य सरकारने कडक धोरण स्वीकारले असून पोलिसांकडून ठिकठिकाणी मोहीम रविल्या जात आहेत. अशाच एका मोहिमेत भामरागड तालुक्यातील बिनागुंडा गावातून जवानांविरुद्ध घातपाताचा कट रचणाऱ्या पाच जहाल माओवाद्यांना मंगळवारी ताब्यात घेतले. यात तीन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गावात लपून बसलेल्या माओवाद्यांना अटक करताना पोलिसांनी गावकऱ्यांना धोका पोहोचू दिला नाही.
अटकेतील तिघीही छत्तीसगडमधील आहेत. पाच जणांवर ३६ लाखांचे इनाम होते.माओवाद्यांच्या प्लाटून क्र. ३२ ची विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरू होयाम ऊर्फ सुमली (वय २८, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर), कमांडर पल्लवी केसा मीडियम ऊर्फ बंडी (वय १९, रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर), सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (वय १९, रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर) यांचा यामध्ये समावेश आहे.
एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार अशी एकूण सात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.गोळीबार करणे टाळलेलाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले. संपूर्ण गावाला घेरून पाच संशयितांना शिताफीने पकडले. गावकऱ्यांना धोका पोहोचू नये म्हणून गोळीबार न करता जवानांनी मोहीम राबवली. काही माओवादी पळून गेले.
दरम्यान पोलीस चकमकीत ठार झालेला माओवाद्यांच्या पोळीत ब्युरोचा सदस्य असलेला मिलिंद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसू (२४, छत्तीसगड) या प्लाटून मेंबरने सोमवारी आत्मसमर्पण केले आहे.
Five Maoists arrested without allowing them to endanger the villagers
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर