विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी येथील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला आहे. वैष्णवीचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली .
सुरज चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांचे पुण्याच्या पोलीस आयुक्तांसोबत बोलणे झाले आहे. अजित पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवार नेहमी दोषींवर कारवाई करा असं म्हणतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. याही प्रकरणात दोषींवर कारवाई होईल
सुरज चव्हाण म्हणाले. राजेंद्र हगवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवारांनी अनेक सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला होता, माझा कोणताही कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्याला टायरमध्ये घेऊन मारावा अशा पद्धतीच्या सूचना अजित दादांनी वारंवार सभेमध्ये दिलेल्या आहेत. हगवणे प्रकरणांमध्ये सुद्धा अजितदादांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत, माध्यमांना माझी विनंती आहे, या प्रकरणाला पक्षीय रूप न देता याला न्यायाच्या भूमिकेतून पहावे.
जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते पैसे न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या पती, सासू व नणंद यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करत २६ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Father-in-law Rajendra Hagavane expelled from NCP in Vaishnavi Hagavane suicide case
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर