विशेष प्रतिनिधी
पुणे : देशाच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबई पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. ४२ वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईमध्ये आतापर्यंत 53 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने आता खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णाला ताप आला म्हणून त्यांनी कोविड टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे सामान्य लोकांनीही अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. वेळोवेळी आपले हात धुवावेत आणि डोळ्यांना, नाकाला वारंवार हात लावणं टाळावं. असे आवाहन केले आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांनी घाबरुन जावू नये. कोविड पॉझिटिव्ह आलेला रुग्णावर घरीच उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत देखील ठीक आहे. मात्र, कोणी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाचे डॉ लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
Corona in Pimpri-Chinchwad, 42-year-old male patient tests positive
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर