विशेष प्रतिनिधी
नांदेड : वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या आहे. कोणी कितीही मोठा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसणारा असो, आम्ही वैष्णवीसाठी न्याय मिळवून देणार. हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे, येथे कोणीही कायद्यापासून सुटू शकत नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला आहे.
पिंपरी येथील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, ही आत्महत्या नसून हत्या आहे. वैष्णवीची बातमी वाचून मन सुन्न झालं. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. हे आत्महत्या प्रकरण नाही, तर स्पष्ट हत्या आहे. एका मुलीला लाडाने वाढवून तिचं लग्न लावलं जातं, पण लग्नानंतर तिच्यावर अत्याचार होतात, मारहाण केली जाते, केस ओढले जातात – हे सर्व अमानवी आहे. वैष्णवीसारख्या मुलीचा छळ करून, तिला आत्महत्येला प्रवृत्त करणे म्हणजे नराधमपणाचं कळस आहे.”
वैष्णवीचा नवरा आणि तिच्या सासरच्या काही सदस्यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून, सासरा आणि एक नातलग फरार आहेत. त्यांचाही लवकरच शोध लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
हुंड्यासाठी मुलींवर होणारे अत्याचार, छळ, आणि हत्या २१व्या शतकातही हे थांबत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या चिमुरड्याचाही विचार कोणालाच नसेल, हे अत्यंत वेदनादायक आहे, असे सांगून चित्रा वाघ म्हणाल्या, सोनं, चांदी, गाडी या सगळ्या गोष्टी मागण्यात आल्या. वैष्णवीच्या आईने वेळोवेळी त्रासाची माहिती दिली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी होती. आता या राक्षसांना शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही.
वैष्णवी ही फक्त तिच्या आई-वडिलांची मुलगी नाही, ती महाराष्ट्राची लेक आहे आणि तिच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार, असा निर्धार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
Vaishnavi Hagawane suicide is not a suicide, it is a murder, Chitra Wagh’s angry allegation
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर