विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची आधीपासूनची इच्छा आहे. त्या मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, राजकारणात काहीही अशक्य नाही. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील’, असे भाकित शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडी म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू, असे विधान आमदार रोहित पवारांनी केलं होतं. याबद्दल शिरसाट म्हणाले, मानसन्मानाचा प्रश्न आता येतो कुठे? रोहित पवारांना माहिती आहे की, आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचंच नाही. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्करताहेत. काका आधीच दुसरीकडे गेले आहेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेल्या आहेत. आता महाविकास आघाडीबरोबर राहणे, हे त्यांना पचनी पडणार नाही आणि ते राहणार पण नाहीत.
येणारे राजकारण तुम्हाला वेगळ्या धाटणीचे तुम्हाला पाहायला मिळेल. संजय शिरसाट म्हणाले की, ‘शरद पवार या महिन्याच्या अखेरीपर्यंत महायुतीत सामील होणार नाहीत. पुढच्या महिन्यात १५ तारखेपर्यंत उलाढाल होतील, असे एकंदरीत राजकीय वर्तुळातून कळतंय. ती माहिती खरी की खोटी माहिती नाही. पण, आता लवकरच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील.
https://youtu.be/13pPK7dGe8Q
Supriya Sule will be a minister at the Centre, Sharad Pawar will be in another party, Sanjay Shirsat’s prediction
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर