विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis माओवाद्यांचा देशातील पहिल्या क्रमांकाचा नेता आहे बसव राजू याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. अनेक माओवादी मारले जात आहेत. अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. आता माओवाद हा शेवटच्या घटका मोजत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.Devendra Fadnavis
पत्रकारांशी बाेलताना फडणवीस म्हणाले, बसव राजू याने चंद्राबाबू नायडू यांच्यावरचा हल्ला केला हाेता. छत्तीसगडमध्ये अनेक मंत्री मारले गेले तो हल्ला त्यानेच घडविला हाेता. आपल्या 45 सीआरपीएफ जवानांवर हल्ला करून त्यांना ठार केले हाेते. त्याचा खात्मा झाल्याने त्यांच्या चळवळीला हादरा बसला आहे. . महाराष्ट्रात देखील अत्यंत महत्त्वाचे माओवादी आत्मसमर्पण झाले आहे. 20 पेक्षा जास्त माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. गेल्या 45 वर्षांपासून विदर्भचा जो लढा चालला होता त्याला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम माननीय सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. ज्यावेळी महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ हा मध्य भारतापासून किंवा सिपेन बिरारपासून वेगळा होऊन महाराष्ट्रामध्ये दाखल झाला, त्यावेळच्या रेवेन्यू रेकॉर्डमध्ये या सगळ्या जमिनी झुडपी जंगल अशा प्रकारे लिहिण्यात आल्या, मध्य प्रदेशने आपले रेकॉर्ड दुरुस्त केल्या. महाराष्ट्राने झुडपी जंगल असा केल्यामुळे 1980 साली जो कायदा आला त्या कायद्यान्वये याला जंगलाचा दर्जा मिळाला. त्यामुळे विदर्भाचा विकास थांबला होता. नागपूर रेल्वे स्टेशनची बिल्डिंग असेल, हाय कोर्टाची बिल्डिंग असेल अशा अनेक बिल्डिंग यांचा जुना रेकॉर्ड पहिला तर झुडपी जंगलांच्या जागांवर आहेत. म्हणून 45 वर्ष मागणी होत होती की यातून काही न काही दिलासा मिळाला पाहिजे. विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प, विकासाचे प्रकल्प हे सगळे मोठ्या प्रमाणात अडले होते. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला आहे. 1996 पूर्वी ज्या जमिनी ग्रँट झाल्या आहेत त्याला एक प्रकारे एक्झेमशन मिळाले आहे. राज्य सरकार या जमिनी केंद्र सरकारकडून मागू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमची जी मागणी होती झोपडपट्ट्या ज्या आहेत यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी एक्झेमशन देण्यात यावे, त्याला देखील मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. 2014 ते 2019 मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण या संदर्भात एक समिती नेमली होती, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Maoism is the last element, believes Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर