विशेष प्रतिनिधी
Pune News: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Case) चर्चेत आलेल्या निलेश चव्हाणविरोधात आणखी गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण याने आपल्या पत्नीबरोबरच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरून रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
निलेशवर २०१९ सालीच विवाहानंतर पत्नीच्या छळाबाबत गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यावर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणांनी टाळाटाळ केली, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
निलेशचे लग्न ३ जून २०१८ रोजी पार पडले. लग्नानंतर काही महिन्यांतच पत्नीला त्यांच्या बेडरूममध्ये एसी आणि सीलिंग फॅनमध्ये काही संशयास्पद गोष्टी दिसल्या. पुढे तिच्या लॅपटॉपवर तिचेच आणि निलेशचे वैयक्तिक व्हिडिओ आढळले. या व्हिडिओंमध्ये निलेश इतर महिलांसोबतही आक्षेपार्ह अवस्थेत दिसतो, असे पीडितेने सांगितले.
जेव्हा पत्नीने याबाबत निलेशला जाब विचारला, तेव्हा त्याने तिला चाकू दाखवून धमकावले, मारहाण केली आणि तिचे दागिने व पैसे हिसकावले. पीडितेने हे सर्व निलेशच्या आई-वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिला पाठिंबा मिळण्याऐवजी तिच्यावरच मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार पत्नीने २०२२ मध्ये वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा नोंदवला गेला असला तरी, निलेशला अटक करण्यात पोलीस विभागाने अनास्था दाखवली. परिणामी, त्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला असतानाही, निलेशला उच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळाले.
निलेश चव्हाण याचे वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे आणि करिष्मा हगवणे यांच्याशी जवळचे मैत्रीपूर्ण संबंध होते. वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचारांदरम्यान मध्यस्थीची चर्चा निलेशच्या करवेनगरमधील ऑफिसमध्ये झाल्याचे समोर आले आहे. या चर्चांमध्ये काय झाले, कुणाचा दबाव होता आणि निलेशने त्यात नेमकी काय भूमिका बजावली याचा तपशील सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. Vaishnavi Hagawane Case
Nilesh Chavan in Vaishnavi Hagawane case, recorded offensive video of wife using spy camera records
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर



















