Ajit Pawar : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचे आश्वासन

Ajit Pawar : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचे आश्वासन

ajit pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कस्पटे कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने सासरच्या जाचाला कंटाळून 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही आज अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

पवार म्हणाले, न्यायालयात खटला ताकदीने चालावा यासाठी चांगला सरकारी वकील देण्याची आमची तयारी आहे. कस्पटे कुटुंबियांकडून काही नावे सुचविण्यास आली आहेत. सरकारी वकिलावर कुणाचाही दबाव येता कामा नये, याची आमच्याकडून खबरदारी घेतली जाईल. मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहोत. त्यावेळी दोन तास आम्ही विमानात एकत्र असू. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे.

अजित पवार म्हणाले की, वैष्णवीच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर मी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करून त्यांना म्हटले होते की, जे घडले ते योग्य नाही. त्यामुळे सदर प्रकरणात कुणाचीही हयगय न करता आणि कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आला तरी न जुमानता कारवाई करा. वैष्णवीला ज्यापद्धतीने छळले आहे, त्यासंबंधित जे कुणी आरोपी असतील ते पकडले गेले पाहिजेत, असे निर्देशही मी त्यांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला अटक केली. तसेच सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते, पण आता त्यांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

कालच वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. मी तुमची भेट घेणार असल्याचे त्यांना सांगितले होते. तसेच तुम्ही मला मनमोकळेपणाने काहीही असेल तर सांगावे, असेही त्यांना बोललो होतो. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक चव्हाण नावाची व्यक्ती पुढे आली आहे. वैष्णवीचे बाळ ज्या पद्धतीने हाताळले गेले ते रेकॉर्डवर आलेले आहे. त्या व्यक्तीविरोधातही तक्रार दाखल झाली असून त्याचाही शोध सुरू आहे. आज जर तो सापडला नाही तर पोलीस आयुक्त पुढील कारवाई करतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. Ajit Pawar

Efforts to conduct the case in Vaishnavi Hagavane death case in a fast-track court, Ajit Pawar assures

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023