विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 70 टक्के मते फतव्यातून येतात. हे राज ठाकरे यांना मान्य आहे का? असा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मनसेला केला आहे.
मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होण्याची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 60 ते 70 टक्के फतव्याद्वारे येतात. हे राज ठाकरे यांना मान्य असेल तर त्यावर आम्ही काय बोलावे? बाळासाहेब ठाकरे यांनी केव्हाही काँग्रेससोबत तडजोड केली नाही.
उद्धव ठाकरे यांनी प्रथम काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आणावी. त्यानंतर हे दोघे एकत्र आले तर त्याचा सर्वांना आनंद होईल, असा सल्लाही केसरकर यांनी दिला.
राजकीय संन्यास घेण्याच्या आपल्या भूमिकेवर ते म्हणाले, मी पक्षातील तरुणांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण आगामी काळात आमदारकी नाही तर राज्यसभा किंवा विधान परिषद लढवण्याची ताकद आपल्यात आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यातील ओलावा हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. दोघांवरही मराठी जनतेचे प्रेशर आहे. हे जसे प्रेशर भावनिक आहे तसेच ते राजकीय सुद्धा आहे. मराठी माणसाला मुंबई वरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल? सुरतच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल, तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावे लागेल. त्यामुळे सर्व मतभेद, सर्व जळमट दूर ठेवून आपल्याला एकत्र यावे लागेल. ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. Deepak Kesarkar
70 percent of Thackeray’s votes are from fatwa, former minister Deepak Kesarkar told Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित