विशेष प्रतिनिधी
पिंपरी : राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दाेन जबाबदाऱ्या सांभाळता येणे शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे यांनी केली आहे. त्यांच्याच सुरात सूर मिसळत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणे आवश्यक आहे, असा सल्ला दिला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना गोऱ्हे यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. महिला आयोगाने मयुरी जगताप प्रकरणामध्ये पोलिसांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालविण्याचा सल्ला दिला असता, तर आतापर्यंत तिला प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता.
मात्र, राज्य महिला आयोगाचे काय चूक आणि बरोबर हे ‘ट्रायल बाय मीडिया’ होऊ नये. मात्र, ते जे काही काम करत आहेत. त्यात अजून काही तज्ज्ञ व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बैठका घ्याव्यात. आयाेगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ते केले होते. महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणे आवश्यक आहे. तसेच अद्यापही महिला आयोगावरील सदस्यांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी राहू नये. संशयितांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गाेऱ्हे म्हणाल्या, पोलिसांकडून या प्रकरणात चार्जशीट दाखल झालेली असून, साक्षी-पुराव्यात कोणताही हस्तक्षेप शक्य नसल्याचे सांगण्यात आले. हुंडाबळीची शिकार झालेल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी काही केले नाही, हे म्हणण्यापेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. समाज म्हणून आपण सर्वजण निष्पक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
वैष्णवी हगवणेची जाऊ मयुरी जगताप हिची भेट घेऊन तिलादेखील न्याय मिळवून देण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. तसेच या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयुरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
Dr. Neelam Gorhe target State Women’s Commission Chairman Rupali Chakankar
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित