विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ram Chander Jangra पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त विधानने करण्याची भाजप नेत्यांची मालिका थांबायला तयार नाही. आपला पती गमावणाऱ्या महिलांमध्ये लढाऊ बाणा नव्हता. जोश नव्हता, असे विधान भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा यांनी केली आहे.Ram Chander Jangra
हरयाणातील भिवानी येथे पंचायत भवनमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना जांगडा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांमध्ये लढाऊ बाणा तयार करण्यासाठी एक मोठी योजना (अग्निवीर) आणली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला वाटतंय की, मोदी देशातील तरुणांना जे प्रशिक्षण देऊ इच्छित आहे, ते प्रशिक्षण जर पर्यटकांनी घेतलेले असते, तर तीन दहशतवादी २६ लोकांना मारून शकले नसते.
जांगडा म्हणाले, जर पर्यटकांच्या हातात काठ्या वा इतर काही असते आणि ते चौहीबाजूंनी दहशतवाद्यांच्या दिशेने गेले असते, तर मी दाव्याने सांगतो की, ५ किंवा ६ लोकांचा मृत्यू झाला असता. पण, तिन्ही दहशतवादी मारले गेले असते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा सामना महिलांनी करायला हवा होता. महिलांनी हात जोडण्याऐवजी सामना केला असता, तर कमी लोक मेले असते. कुंकू गमावलेल्या महिलांमध्ये लढाऊ बाणा नव्हता.
Women who lost their husbands lacked fighting spirit, passion, BJP MP’s controversial statement on Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित