विशेष प्रतिनिधी
पुणे : Eknath Shinde वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही घटना अमानवीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना कोणीही पाठिशी घालू नये. तसे केल्यास कोणीही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केलेत. ते म्हणाले, सुनेला मारहाण होणं, पैशांची मागणी करणं अत्यंत चुकीचे आहे. आताच्या काळामध्ये अशी मानसिकता चांगली नाही. सून आपल्या मुलीसारखीच आहे. लाडकी बहीण, लाडकी मुलगी अशापद्धतीने लाडकी सून देखील मानली पाहिजे. तशी मानसिकता केली पाहिजे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिस सखोल तपास करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना आदेश दिले आहेत. अशा घटनांमध्ये कोणीही राजकारण आणता कामा नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा आहे. तपासात त्रुटी राहणार नाहीत.
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. मात्र वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर फरार होते. त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. दरम्यान 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली, त्यानंतर वैष्णवीचा मृतदेह औंधच्या जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा मृतदेह पाहाण्यासाठी 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन रुग्णालयात आला होता. त्याचवेळी त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तिथूनच तो फरार झाल्याची माहिती आता समोर येत आहे, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंब आणि जालिंदर सुपेकर यांचे जवळचे संबंध आहेत. हगवणे कुटुंब सुपेकर यांचा त्यांच्या सूनांना धाक दाखवायचं, हगवणे कुटुंबाची सून मयुरीच्या आईने याविरोधात महिला आयोगाला एक पत्र देखील लिहिलं होतं, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
Action will be taken against anyone who supports the guilty, Deputy Chief Minister Shinde assured Vaishnavi’s parents
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित