Reserve Bank of India : विदेशी गुंतवणुकीवरून मोदी सरकारचा अपप्रचार; काँग्रेस आणि माध्यमांची ‘नेट एफडीआय’ घटल्याच्या मुद्द्यावरून दिशाभूल

Reserve Bank of India : विदेशी गुंतवणुकीवरून मोदी सरकारचा अपप्रचार; काँग्रेस आणि माध्यमांची ‘नेट एफडीआय’ घटल्याच्या मुद्द्यावरून दिशाभूल

Reserve Bank of India

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Reserve Bank of India परदेशी थेट गुंतवणूक (FDI) कमी झाल्याच्या कथित घटनेवरून काँग्रेस पक्ष आणि काही माध्यमांनी मोदी सरकारविरोधात आर्थिक आपत्तीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच बळावलेला आहे. Reserve Bank of India

२३ मे रोजी काँग्रेसच्या केरळ युनिटने ट्विटरवर दावा केला की, “भारतातील परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास घटला आहे आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही देशावर विश्वास ठेवणे सोडले आहे. हे ११ वर्षांच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आहेत.”

‘द वायर’सारख्या डाव्या विचारसरणीच्या पोर्टलच्या लेखिका सीमा चिश्ती यांनी म्हटले की, “भारताचे नेट एफडीआय (FDI) ९६.५% नी कोसळले आहे.” माजी खासदार आणि टीएमसीचे नेते जवार सिरकार यांनीही ‘मोदींच्या भारतावर कोणीही विश्वास ठेवत नाही’ अशी टीका केली.

आरआयबी ( RBI) आणि PIB च्या आकडेवारीनुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतात $४५.१५ अब्ज इतकी FDI आली होती, जी २०२४-२५ पर्यंत $८१ अब्जांवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या दशकात FDI मध्ये सातत्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १३.६% वाढ नोंदवली गेली आहे.

RBI च्या मे २०२५ च्या बुलेटिननुसार, २०२४-२५ मध्ये नेट FDI फक्त $०.४ अब्ज राहिला, जो मागील वर्षी $१०.१ अब्ज होता. हे पाहून काही माध्यमांनी ९६% घसरण असल्याचे सांगितले आणि त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या अपयशाचे खोटे चित्र उभे केले.

मात्र, नेट FDI म्हणजे ग्रॉस FDI मधून बाह्य गुंतवणूक (Indian companies investing abroad), परतावा (repatriation), आणि disinvestment वजा केल्यावर उरलेली रक्कम. यातील वाढत्या बाह्य गुंतवणुकीचा अर्थ भारतीय कंपन्या आता जागतिक स्तरावर विस्तार करत आहेत आणि परदेशी गुंतवणूकदारांना भारतातून सहज exit मिळत आहे – ही परिपक्व अर्थव्यवस्थेची खूण आहे.

“नेट FDI मध्ये घसरण झाली आहे कारण परतावा आणि भारतीय कंपन्यांची परदेशात गुंतवणूक वाढली आहे. ही गोष्ट भारताच्या आर्थिक परिपक्वतेचे आणि खुल्या बाजाराच्या यशस्वीतेचे प्रतीक आहे,” असे RBI ने स्पष्ट केले आहे.

FDI मध्ये घसरण नसून उलट वाढ झाली आहे. भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असून भारत $६८६.१ अब्ज इतक्या विदेशी गंगाजळीसह ११ महिने आयात करू शकतो. मात्र काँग्रेस आणि काही माध्यमांनी संपूर्ण चित्र न दाखवता केवळ ‘नेट FDI’चा मुद्दा हायलाईट करत दिशाभूल केली. प्रत्यक्षात, भारत ही एक विश्वासार्ह आणि आकर्षक गुंतवणूक स्थळ आहे आणि देश ४थ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे झपाट्याने वाटचाल करत आहे.

Congress and media mislead on the issue of decline in ‘net FDI, foreign investment

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023