Amit Shah : अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी कानमंत्र देणार

Amit Shah : अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी कानमंत्र देणार

Amit Shah

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून या दरम्यान ते नागपूर, नांदेड आणि मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

शाह यांची नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट तसेच नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण मेमोरियल येथील कार्यक्रमांना विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमांबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही त्यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. मराठवाड्यातील मंडल अध्यक्षांशी ते संवाद साधणार आहेत. तसेच भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्याशीही चर्चा करून निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. राज्य भाजपने काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. आता प्रदेश कार्यकारिणी, प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या दृष्टीनेही शाह प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या होणाऱ्या निवडणुकांमधून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपली ताकद वाढण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने रणनीतीचीही आखणी सुरू आहे, जागावाटपावरून तिन्ही पक्षांत मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. या प्रत्येक पक्षातील एक गट महायुतीतून कमी जागा लढवण्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक लढवू, या भूमिकेत आहे. या निवडणुकांबाबत अमित शाहांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचा लक्ष राहील.

माधवबाग संकुलातील लक्ष्मी नारायण मंदिराला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २७ मे रोजी जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा ऐतिहासिक क्षण असलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदीदेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.

शाह हे रविवारी रात्री साडेनऊला नागपूर येथे दाखल होतील. सोमवारी सकाळी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १ वाजता चिंचोली येथील एनएफएसयूच्या स्थायी परिषद कार्यालयाच्या भूमिपूजनाला ते उपस्थित राहतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता ते नांदेडला पोहोचणार आहेत. दुपारी नांदेड येथील आनंदनगरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे ते अनावरण करतील. दुपारीच ते कुसुम ऑडिटोरियम येथे बैठक घेणार आहेत. संध्याकाळी नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहे. Amit Shah

Amit Shah to tour Maharashtra from today, will advise office bearers and workers for elections

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023