विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : Shashi Tharoor पहलगाममध्ये हल्लेखोरांनी पीडितांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यात कोणतीही चूक किंवा चुकून झालेले कृत्य नव्हते. ही एक योजनाबद्ध केलेली धार्मिक हत्या होती. २६ जणांचा बळी गेलेल्या या हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिक होते. बहुतेक सर्वजण हिंदू होते, असे काँग्रेसचे खासदार आणि केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य शशि थरूर यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.Shashi Tharoor
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धार्मिक ओळख करून हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगताना थरूर म्हणाले की, एका हिंदू प्राध्यापकाने कलमा (इस्लामी श्लोक) म्हणून आपला जीव वाचवला. एका ठिकाणी नवऱ्याला गोळ्या घालून पत्नीला सांगण्यात आले की, “जा आणि सगळ्या जगाला सांग, तुझा नवरा केवळ हिंदू असल्याने मारला गेला.
थरूर यांनी यावेळी भारतीय समाजाच्या संयमाचे कौतुक करत सांगितले की, “ज्याप्रकारे संपूर्ण देशाने एकजुटीने या क्रौर्याला उत्तर दिलं, ते गौरवास्पद आहे. कुठेही हिंसाचाराचा उद्रेक झाला नाही. या हल्ल्याचा हेतू केवळ हत्या नव्हता, तर काश्मीरमधील शांतता संपविणे आणि पर्यटनाच्या विकासाला आळा घालणे होता. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये अस्पेन (कोलोरॅडो, अमेरिका)पेक्षा जास्त पर्यटक आले. ही केवळ सामान्य स्थिती नव्हे तर समृद्धीची खूण होती.
#WATCH | New York, US: During an interaction at the Consulate, Congress MP Shashi Tharoor says, "Our idea is very much to speak to a cross section of public and political opinion in each of the countries we're going to about recent events which trouble a number of people around… pic.twitter.com/UlxYqYmH6T
— ANI (@ANI) May 24, 2025
कलम ३७० हटविल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीरमध्ये स्थिरता निर्माण झाली होती. पण या यशस्वी बदलावर धक्का देण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
थरूर यांनी स्पष्ट केलं की, या हल्ल्यानंतर अवघ्या एका तासात ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली. भारताला हे समजायला फारसा वेळ लागला नाही की, हे कुठून आले,” असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा उल्लेख केला.
Only people of one religion were killed, Shashi Tharoor presented the truth of Pahalgam attack at the Indian embassy in the US
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित