विशेष प्रतिनिधी
मंदसौर : Madhya Pradesh दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर एका महिलेसोबत अश्लील कृत्य करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशातील मनोहरलाल ढाकड यांना मंदसौर पोलिसांनी अटक केली आहे. १३ मे रोजी भानपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे ही कृती स्पष्टपणे कैद झाली होती.Madhya Pradesh
व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या गाडीशेजारी संपूर्ण नग्न अवस्थेतील महिला आणि ढाकड हे स्पष्ट दिसत आहेत. त्यानंतर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी ढाकड यांना मंदसौरमधील आठ लाईन परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मंदसौरचे पोलीस अधीक्षक अभिषेक आनंद यांनी सांगितले की, १३ मे रोजी घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला होता. पोलिसांनी व्हिडिओचा तपास केला आणि आरोपींची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.”
दरम्यान, सोशल मीडियावर ढाकड यांच्याबाबत भाजपचे नेते किंवा आमदार असल्याचे दावे करण्यात येत होते. मात्र, मंदसौर जिल्हा भाजप अध्यक्ष राजेश दीक्षित यांनी सांगितले की मनोहरलाल ढाकड भाजपचे प्राथमिक सदस्यदेखील नाहीत. त्यांच्या पत्नी सोहन बाई या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत आणि त्या भाजपशी संलग्न आहेत.”
ढाकड हे ‘ढाकड महासभेचे राष्ट्रीय सचिव’ होते, परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २९६, २८५ आणि ३(५) नुसार ढाकड आणि व्हिडिओतील महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी व्हिडिओ लीक करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मशी संबंधित व्यक्तींनाही नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
Madhya Pradesh leader caught on CCTV having indecent act with woman on expressway arrested
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित