विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे खरे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पवन कल्याण यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्ट सोबत त्यांनी पंतप्रधानांसोबतचा फोटोही पोस्ट केला असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या महत्त्वपूर्ण बैठकीला एनडीए शासित २० मुख्यमंत्री आणि १७ उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांची पंतप्रधान मोदींसोबत खास भेट झाली. या भेटीचा एक फोटो पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर शेअर करताच तो क्षणभरात व्हायरल झाला.
या बैठकीनंतर पवन कल्याण यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले, “देशाचे खरे हिरो, आपले आदरणीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भोजनाचा सन्मान लाभला. त्यांचे देशप्रेम आणि वचनबद्धता ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे.”
Having lunch with ‘True Hero’ of our Bharat and our beloved Leader‘ Hon PM Sri @narendramodi ji.’
His love and commitment for Nation is always inspiring to all of us.@mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4India @JanaSenaParty pic.twitter.com/s1fjiZ6wPb— Pawan Kalyan (@PawanKalyan) May 25, 2025
या फोटोमागे एक मजेशीर प्रसंगही घडला. बैठकीदरम्यान शिंदे आणि पवन कल्याण यांच्यात चित्रपटांबाबत गप्पा सुरू होत्या. शिंदे यांनी पवन कल्याणला उद्देशून म्हटले, “तुम्ही हिरो आहात, पण देशाचे खरे हिरो मोदीसाहेब आहेत.” तेवढ्यात मोदी आले आणि दोघांमध्ये काय चर्चा सुरू आहे, असे विचारले. पवन कल्याण यांनी हसत सांगितले, “शिंदे म्हणाले मी हिरो आहे, पण देशाचे खरे हिरो तुम्हीच आहात!” या क्षणानंतर काढलेला फोटो आता ‘हिरोजचा संगम’ म्हणून चर्चेत आहे.
या विशेष परिषदेत एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि जातीय जनगणनेच्या अंमलबजावणीबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करत ठराव मांडला, ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला. बैठकीत केंद्र-राज्य समन्वय, विकासकामे आणि भविष्यातील धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील प्रकल्पांबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन दिले.
The country’s true hero, Prime Minister Narendra Modi, praised by superstar Pawan Kalyan
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित