विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांवर कोणतीही कायदेशीर किंवा आर्थिक कारवाई होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले . “चूक झाली आहे हे मान्य आहे. त्यांनी अर्ज करायला नको होते, पण आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही,” असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यातील अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचे चौकशीतून समोर आले आहे सुमारे २ हजार ६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय, चारचाकी वाहन असलेले, तसेच वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असलेले अनेक महिला लाभार्थ्यांमध्ये आढळून आल्या. या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर शासनाने चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
योजनेचे स्वरूप आणि निकष स्पष्टपणे सांगितले असले तरी सुरुवातीच्या काळात अर्ज तपासण्यास वेळ मिळाला नाही, हे पवार यांनी मान्य केले. “योजना सुरू करताना फार कमी वेळ होता. निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या होत्या. त्यामुळे योजनेचे प्रत्येक अर्ज बारकाईने तपासण्याचा पुरेसा वेळ आम्हाला मिळाला नाही,” असेही ते म्हणाले.
योजना लागू केल्यावर, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सुमारे ४५० कोटी रुपये अपात्र लाभार्थींच्या खात्यात जमा झाले. डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांची एकूण संख्या २.४६ कोटी होती, जी आता घटून २.४१ कोटींवर आली आहे.
राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, या अपात्र महिलांकडून कोणतीही रक्कम परत घेण्यात येणार नाही. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, “आता त्या महिलांना चुकीचे समजले आहे. पुढे असे होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. परंतु मागे जाऊन कारवाई करणे योग्य ठरणार नाही.”
No action will be taken against ineligible women in the ‘Ladki Bahin’ scheme; Ajit Pawar’s big statement
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका