लैंगिक शोषणाचे आरोप असलेले ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात साक्षी मलिकच नाही, तर ऑलिम्पिक विजेते इतर खेळाडूही दिल्लीत आंदोलन करत होते. त्याला आता एक वर्ष होऊन गेलं. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून ब्रिजभूषण यांना हटवावं, त्याठिकाणी महिला अध्यक्षाची नेमणूक करावी, अशी प्रामुख्यानं या खेळाडूंची मागणी होती. विनेश फोगट, बजरंग पुनिया यासह विविध खेळाडूंनी आंदोलन केलं. पण त्यात त्यांना अपयश आलं. ब्रिजभूषण यांची खास व्यक्ती असलेल्या संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालीय.