विशेष प्रतिनिधी
Mumbai News : महापालिका निवडणुका तोंडावर असताना मुंबईत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. कांदिवली येथे भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. या बैठकीपूर्वीच भाजपच्या दोन गटात राडा झाला. आशिष शेलार यांच्या समोरच दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कांदिवली पूर्वच्या जानुपाडा येथे हा प्रकार घडला आहे. Ashish Shelar
आशिष शेलार हे जानुपाडा येथील रहिवासी, पदाधिकारी यांना भेटण्यासाठी आले होते. जानुपाडा इथल्या रहिवाशांसमोर सध्या वन जमीन मालकीच्या वादात अडकले आहेत. येथील जमीन वन जमीन आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इथल्या लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही. याचा आढावा घेण्यासाठी आशिष शेलार आज इथे आले होते. तेव्हाच भाजपच्या दोन गटात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
आशिष शेलार यांच्या गाडीसमोरच कार्यकर्ते एकमेकांना मारत होते. हा वाद शेवटी पोलिस ठाण्यात पोहोचला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. यावेळी एका कार्यकर्त्याने म्हटले की, हा आमच्या पक्षातील वाद आहे. वरिष्ठ याची दखल घेतील. आता मेडिकल चाचणीसाठी चाललो आहोत. त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील कार्यवाही करू. Ashish Shelar
BJP dispute escalates, activists clash in front of Ashish Shelar
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी