विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, पक्षातील काही नेत्यांशी त्यांचे मतभेद असले तरी ते काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून थरूर आणि काँग्रेस नेतृत्वातील संबंध तणावपूर्ण झाले असून, विशेषतः केरळमधील अंतर्गत गटबाजीमुळे ते सतत चर्चेत आहेत. Shashi Tharoor
थरूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “काँग्रेस, तिचे मूल्य, तिचे कार्यकर्ते मला अत्यंत प्रिय आहेत. गेल्या १६ वर्षांत मी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांसोबत निकटून काम केले आहे. ते माझे मित्र, भावासारखे आहेत. मात्र, काही नेत्यांशी माझे मतभेद आहेत. तुम्हालाही माहीत आहे की, याबाबत काही गोष्टी माध्यमांतून आधीच समोर आल्या आहेत.” Shashi Tharoor
थरूर यांच्यावर नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी सार्वजनिक टीका केली होती. त्यावर त्यांनी संयम राखला असला, तरी हा वाद उफाळून आला होता. आता या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘मी पक्षातच आहे, कुठेही जाणार नाही’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसचा सदस्य आहे. पक्षाला माझ्याबद्दल जे योग्य वाटेल, ते निर्णय ते घेईल,” असे सांगून त्यांनी कोणतेही नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला.
निलांबूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते का सहभागी झाले नाहीत, त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, “माझी तिथे बोलावणीच झाली नाही. गेल्या वर्षी वायनाडमधील पोटनिवडणुकीवेळीही असेच झाले होते, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे.
थरूर यांनी त्यांच्या मतभेद राष्ट्रीय की प्रादेशिक नेतृत्वासोबत आहेत का, यावर मात्र स्पष्ट भाष्य केले नाही. मात्र माध्यमांच्या अंदाजानुसार, त्यांचे मतभेद प्रामुख्याने केरळ काँग्रेसमधील एका विशिष्ट गटाशी आहेत, जो त्यांच्याविरुद्ध सातत्याने भूमिकाही घेतो आहे.
here are some differences in the party, but I will not leave the Congress, Shashi Tharoor’s clear stand
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी