विशेष प्रतिनिधी
तेहरान: अमरिकेने शनिवारी रात्री इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. इराणच्या फोर्डो,नातांझ,एसफहान या तीन आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ले केले. हल्ला केलेले हे तिन्ही आण्विक तळ इराणच्यादृष्टीने महत्त्वाचे होते. US attack
जमिनीच्या आतमध्ये असलेल्या या आण्विक तळावर अमेरिकेने मासिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57A/B या लढाऊ विमानांचा बाँब टाकण्यासाठी वापर केला. या बाँबमध्ये जमिनीच्या आतमध्ये खोलवर धमाका करण्याची क्षमता असते. त्यामुळे या हल्ल्यात इराणचे तिन्ही आण्विक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन अमेरिकेला इशारा दिला आहे.
इराणने प्रचंड संताप व्यक्त करत ‘युद्ध तुम्ही सुरु केलं आहे, शेवट आम्ही करु. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष्य असेल’, अशी धमकी दिली आहे. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. अमेरिकेचं आजपर्यंत कधी झालं नाही असं नुकसान होईल, असा इशाराही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी दिला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावर विपरीत पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
रविवारी पहाटे इराणच्या तीन आण्विक तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराण युद्ध थांबवेल आणि शांतता प्रस्थापित करेल अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे कौतूकही केले. अमेरिकी हवाई दलाने अत्यंत अचूकरित्या आणि वेगाने हल्ला केला. अमेरिकन लष्कराने केलेल्या या कामगिरीच्या आसपासही जगातील कोणतेही सैन्य जाऊ शकत नाही. आता अमेरिकन लष्कराला पुन्हा इतक्या मोठ्या क्षमतेचा हल्ला करण्याची वेळ येणार नाही, अशी आशा मी करतो. मात्र, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले.
गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांचे मोठे युद्ध सुरु आहे. इस्रायलच्या लष्कराकडून सातत्याने इराणमधील अणुशास्त्रज्ञ आणि इराण लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून अयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे खामेनी यांनी स्वत:ला काही झाल्यास आपले उत्तराधिकारी असावेत म्हणून तीन जणांची निवड केली आहे. US attack
US attack on three nuclear facilities of Iran, Iran threatens to target US personnel
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी