विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला आहे. दहशतवादाच्या बाबतीत आता कोणतीही तडजोड चालणार नाही आणि जगाने याबाबतीत शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन स्वीकारावा, अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मांडली आहे. Jaishankar
वॉशिंग्टन डीसी येथे होणाऱ्या ‘क्वाड’ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी बोलत होते. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवाद्यांना आणि त्यांचे बळी ठरलेल्या पीडितांना एकाच तराजूत तोलणे अन्यायकारक आहे. सीमेपलीकडे दहशतवादी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये, हा दृष्टिकोन आता भारत मान्य करणार नाही.
ही वक्तव्य भारताने नुकतीच राबवलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही लष्करी कारवाई लक्षात घेता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
या कारवाईनंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ८, ९ आणि १० मे रोजी पाकिस्तानी लष्कराने भारताच्या काही लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने लगेच प्रतिउत्तर देत पाकिस्तानच्या रडार सिस्टिम, कमांड सेंटर्स आणि एअर डिफेन्स यंत्रणांवर निशाणा साधला. चार दिवसांच्या तणावानंतर १० मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतीय समकक्ष अधिकाऱ्याशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली आणि त्यानंतर युद्धविराम जाहीर करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला आहे. भारत आपले नागरिक सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही कठोर पावले उचलण्यास मागे हटणार नाही. आपण आण्विक धमक्यांना भीक घालणार नाही.”
न्यूयॉर्कमध्ये ‘न्यूजवीक’चे CEO देव प्रगाड यांच्याशी संवाद साधताना जयशंकर यांनी सांगितले की, “जो हल्ला करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. दहशतवाद्यांना पुन्हा मोकळं रान मिळणार नाही. ‘प्रॉक्सी वॉर’चा काळ संपला.”
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता दहशतवादाला उत्तर देण्याचा नवीन निकष निश्चित केला आहे. भारताची ‘न्यू नॉर्मल’ भूमिका म्हणजे प्रत्येक दहशतवादी कारवाईचा त्वरित आणि ठोस प्रत्युत्तर.
जयशंकर यांचे हे स्पष्ट वक्तव्य जागतिक स्तरावर भारताच्या उग्र आणि निर्णायक धोरणाचं प्रतिबिंब आहे. दहशतवादाच्या विरोधात भारत आता फक्त बघ्याची भूमिका न घेता निर्णायक कारवाई करणारा देश म्हणून पुढे येत आहे.
The world should show zero tolerance towards terrorism, Jaishankar’s firm stance in Washington
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी