विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जगप्रसिद्ध दाल लेक आता एका डच पर्यटकामुळे नव्याने स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. ६९ वर्षीय एलिस हुबर्टिना स्पानडरमन या नेदरलँड्स (हॉलंड) येथून आलेल्या पर्यटक महिलेने गेली ५ वर्षं लेकमधील प्लास्टिकचा कचरा आणि अन्य घाण स्वखर्चाने आणि स्वतःच्या मेहनतीने उचलण्याचा निर्धार केला आहे. स्थानिकांना आणि प्रशासनालाही जागं करणाऱ्या त्यांच्या या मोहिमेला ‘हॉलंडसे स्कूनमाक’ म्हणजेच ‘डच स्वच्छता चळवळ’ असं संबोधलं जात आहे. Dutch tourist woman
काश्मीरमध्ये पर्यटन वाढत असताना पर्यावरण रक्षणाचं सुंदर उदाहरण भारतातील आणि परदेशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एलिस स्पानडरमन यांचं कार्य हे सिद्ध करतं की, बदलाची सुरुवात एका माणसाकडूनही होऊ शकते.
स्पानडरमन यांचं हे काम काही अचानक सुरू झालेलं नाही. त्या म्हणतात, “मी हॉलंडमध्ये समुद्रकिनाऱ्यावर राहत होते. तिथेही काही जहाजं पाण्यात कचरा टाकत, तेव्हा मी तो उचलायला सुरुवात केली. ही माझ्या स्वभावातच आहे . कचरा दिसला की मी दुर्लक्ष करू शकत नाही.”
एलिस पहिल्यांदा २५ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये आल्या आणि डाळ लेकचं अप्रतिम सौंदर्य पाहून त्या मंत्रमुग्ध झाल्या. पण पाच वर्षांपूर्वी जेव्हा त्या पुन्हा काश्मीरमध्ये राहण्यासाठी परत आल्या, तेव्हा डल लेकची दुर्दशा पाहून त्या व्यथित झाल्या.
“मी काश्मीरमध्ये पाय ठेवल्याच्या पहिल्याच दिवशी कचरा उचलायला सुरुवात केली. आता पाच वर्षं झालीत,” असं त्या सांगतात.
स्पानडरमन यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये स्वतःची एक छोटी बोट विकत घेतली, जी त्या रोज डल लेकमध्ये चालवतात.. त्या म्हणतात, “कोणी करत नसेल तर मी तरी करेन. कदाचित हे एखाद्या महासागरातील एक थेंब असेल, पण मला हे ठाऊक आहे की इतरांना शिकवायचं असेल, तर स्वतः उदाहरण बनणं सर्वात प्रभावी असतं. लोक आपोआप लक्ष देतात.”
एलिस यांना केवळ कचरा उचलण्यात रस नाही – त्यांचा उद्देश आहे जनजागृती. त्या सांगतात, “मला लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करायची आहे. आपल्याला निसर्गाने जे दिलं आहे, त्याची जबाबदारी आपली आहे.”
एलिसच्या सततच्या प्रयत्नांमुळे स्थानिक काश्मिरी नागरिकांमध्येही सकारात्मक बदल दिसून येत आहेत. अनेक पर्यटक आणि बोटचालक आता डल लेकमध्ये कचरा न टाकण्याबाबत जागरूक झाले आहेत. अनेक लोक त्यांच्या कामाचं कौतुक करत सोशल मीडियावरही त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहेत.
Dutch tourist woman takes on the responsibility of cleaning Dal Lake
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी