Kiren Rijiju : काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव यामुळेच बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले , किरेन रिजिजू यांचा आरोप

Kiren Rijiju : काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव यामुळेच बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले , किरेन रिजिजू यांचा आरोप

Kiren Rijiju

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kiren Rijiju काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव आणि आजारपण यामुळे बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले असा आरोप असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष पक्ष भारतीय संविधानाचा सन्मान करतो, असेही त्यांनी सांगितले.Kiren Rijiju

भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाबाबत बोलताना हा आरोप केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी बोलताना किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनामागील करणे सांगितली.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मत मिळाली नाही. संविधानाला वाचविण्यासाठी भाजपला मत देऊ नका असे आम्हाला सांगण्यात आल्याचे काही दलित बांधवांनी मला सांगितल्याचा दावा करताना किरेन रिजिजू म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग कधीही काँग्रेसला मत देणार नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलेले आहे. काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव यामुळे बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले.

बाबासाहेबांना भाजप सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 71 वर्षानंतर पंतप्रधान मोदींनी मला कायदामंत्री केले. दलित व्यक्तीला बाबासाहेबांच्या खुर्चीवर बसवण्याची संधी मोदींनी दिली. संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. आम्ही पक्ष आणि देशाच्या संविधानाचा सन्मान करतो, असे किरेन रिजिजू म्हणाले.

रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष केल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जीन्स पॅन्ट घालून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे रवींद्र चव्हाण यांना अध्यक्ष बनवले आहे.

Tension given by Congress, two defeats are the reason why Babasaheb left us before his time, alleges Kiren Rijiju

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023