विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सरकारची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवून मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप राऊत यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड़ खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे, त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांचे बंधू श्री. सुदाम शंकरराव शेळके यांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जानुसार संपादन जागेच्या बदल्यात पर्यायी क्षेत्र मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेली होती, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) पत्रात लिहले आहे.
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, काय सुरू आहे महाराष्ट्रात? थांबवा ही लुटमार!, असा प्रश्न करत राऊत यांनी शेळकेंचा घोटाळा समोर आणला आहे. राऊत यांनी पत्रात विविध प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारले प्रश्न :
1. मा. मुख्यमंत्री महोदय,. सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडविलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? त्याबाबत आपल्या मार्फत त्वरित आदेश देण्यात यावेत.
2. भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांची राहती घरे व बागायती जमिनी आपण घेता, त्यांना कधीही आपण बदली जमिनी दिल्या नाहीत, त्यांना हा न्याय का नाही? अशा अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन रक्कम स्वीकारलेली आहे, ती परत घेऊन त्यांना बदली जमीन देणार का? बदली जमिनीचा न्याय फक्त आमदार या नात्याने श्री. सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनाच आहे का? त्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या संपादनामध्ये आलेल्या जमिनी आपण घेतलेल्या नाहीत. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?
3. श्री. सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्खनन करताना त्या जमिनीमधून असणारे मुख्य गाव रस्ते फोडले आहेत, ग्रामस्थांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत शासनाकडून श्री. सुनील शेळके यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात आलेला नाही.
4. या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी सहभागी आहेत. त्याचीदेखील चौकशी आपल्या कार्यालयामार्फत करण्यात यावी. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याची लूट कशा पद्धतीने सुरू आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. पैशाअभावी राज्यातील अनेक योजना रखडल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, पण शेळकेंसारखे आमदार सरकारची लूट करून गब्बर झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करावाच, पण ‘एसआयटी’ स्थापन करून चौकशीचे आदेशही द्यावेत. ही नम्र विनंती.
Sanjay Raut writes to the Chief Minister alleging corruption by MLA Sunil Shelke by embezzling crores of rupees in royalties
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी