विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिले नाही म्हणून जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना चांगलेच सुनावले. दादा कोंडकेंचे उत्तर देऊ नका असे राठोड याना फटकारत मुनंगटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी देखील मंत्री राठोड यांना अपेक्षित उत्तर देण्यास सांगितले.
“नाल्यांच्या योग्य नियोजनाअभावी नाल्यांशेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसतो. नाल्यांची संरक्षक भिंत नियमांनुसार बांधली जात नाही. या प्रकरणी पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर सरकार त्या अभियंत्यावर कारवाई करणार का? याशिवाय जिथे – जिथे नाले असतील त्यांच्या दुरुस्तीविषयी सरकारचे नियोजन काय?” असा सवाल सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला केला. यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड म्हणाले की, “सरकार अशा नाल्यांचे सर्वेक्षण करेल. नाल्यांची रुंदी तपासून ती वाढवावी लागेल का ते पाहील. भूमीअभिलेख विभागाकरवी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करेल. तसेच उर्वरित नाल्यांचे बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू.” मंत्री संजय राठोड यांचे उत्तर ऐकून सुधीर मुनगंटीवार यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले की, नाल्याची नैसर्गिक रुंदी जेवढी आहे, तेवढीच राहिली पाहिजे. सरकार याची खबरदारी घेणार आहे का? त्यावर मंत्री राठोड फक्त सजेशन फॉर ऍक्शन (यावर विचार करू किंवा सल्ला ऐकला असून, त्यावर कार्यवाही करू) असे त्रोटक उत्तर दिले. त्यावर मुनगंटीवर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुनगंटीवार म्हणाले की, “मंत्री संजय राठोड आमचे मित्र आहेत. पण नाल्यांची नैसर्गिक रुंदी कायम राहील का? असा माझा प्रश्न होता. त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन एवढेच उत्तर दिले. हे ॲक्शन, ऑन्ली ॲक्शन, नो रिॲक्शन असे असले पाहिजे. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की, नाल्याची नैसर्गिक रुंदी काय राहिली पाहिजे. त्यांच्याकडून हमी यायला हवी की नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल. ती हमी न देता सजेशन फॉर अॅक्शन हे काय उत्तर आहे का? हे तर द्विअर्थी उत्तर झाले. हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? हे द्वीअर्थी आहे का? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.” असे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या नाराजीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय राठोड यांना मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याची सूचना केली.
Don’t answer like Dada Kondke, Sudhir Mungantiwar told Minister Sanjay Rathod
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी