विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषासूत्राचा जीआर अधिकृतपणे रद्द केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून आता ठाकरे गटा विरोधात बॅनरबाजी केली आहे. घशात गेले दात, उबाठानेच केला मराठीचा घात, असे बॅनर लावून ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे. Shinde group attacks Thackeray
मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाने मातोश्री आणि कलानगर परिसरात आक्रमक बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटावर थेट हल्ला चढवण्यात आला असून, मराठी भाषेबाबत “दुटप्पी भूमिका घेतली” असा आरोप करण्यात आला आहे.
सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उबाठानेच केला मराठीचा घात…” अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेतृत्वावर निशाणा साधण्यात आला आहे. “त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय?” अशी विचारणा करत शिंदे गटाने ठाकरे गटाच्या भूतकाळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मराठीच्या मुद्यावर ठाकरे गटाविरोधात आक्रमक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बॅनरबाजी होऊ लागल्याने राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
त्रिभाषा सूत्राचा निर्णय हा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घेतला होता आणि त्यांच्याच काळात घेतला गेला, याचा संपूर्ण घटनाक्रम पुराव्यानिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. 21 सप्टेंबर 2020 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तज्ञांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. 16 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सरकारचा जीआर जारी केला. हा टास्क फोर्स डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्याचाच आधार घेत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, जीआर रद्द झाल्यानंतर आता 5 जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मेळावा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने या विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीदेखील भाषणे होणार आहेत. राजकीय व्यासपीठावर दोन्ही ठाकरे हे जवळपास 20 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.
Teeth stuck in throat, Ubatha himself attacked Marathi, Shinde group attacks Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी