विशेष प्रतिनिधी
पुणे : गोवा येथून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानामध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. उड्डाणाच्या दरम्यान विमानाच्या एका खिडकीचा फ्रेम निसटल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, विमान कंपनीने त्वरित स्पष्टीकरण देत सांगितले की, संबंधित फ्रेम ही केवळ “कॉस्मेटिक ट्रिम” होती आणि यामुळे विमानाच्या संरचनेवर अथवा प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही. SpiceJet plane
स्पाइसजेटने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, “Q400 प्रकाराच्या विमानामधील एका खिडकीवरील कॉस्मेटिक फ्रेम ढिली झाली होती आणि ती उड्डाणादरम्यान निसटली. ही फ्रेम फक्त सावलीसाठी वापरण्यात येणारी एक नॉन-स्ट्रक्चरल घटक आहे आणि विमानाच्या संरचना अथवा दबाव व्यवस्थापन यावर याचा काहीही परिणाम झाला नाही.”
प्रत्यक्षा प्रवाशांच्या माहितीनुसार, उड्डाण सुरु असताना अचानक खिडकीजवळ आवाज झाला आणि काही भाग ढिला झाला. काही प्रवासी थोड्या वेळासाठी अस्वस्थ झाले. मात्र, क्रू सदस्यांनी परिस्थिती शांतपणे हाताळत प्रवाशांना धीर दिला.
घटनेनंतर विमानाने पुणे विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केले. त्यानंतर, संबंधित खिडकीची फ्रेम तात्काळ तपासून दुरुस्त करण्यात आली. स्पाइसजेटने सांगितले की, “ही सामान्य देखभाल प्रक्रिया आहे आणि अशा कॉस्मेटिक समस्यांवर नियमितपणे कार्यवाही केली जाते.”
#SpiceJet from Goa to Pune today. The whole interior window assembly just fell off mid flight. And this flight is now supposed to take off and head to Jaipur. Wonder if it’s air worthy @ShivAroor @VishnuNDTV @DGCAIndia pic.twitter.com/x5YV3Qj2vu
— Aatish Mishra (@whatesh) July 1, 2025
विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA)नेही या घटनेची नोंद घेतली असून आवश्यक असल्यास तपास केला जाईल, असे सूत्रांकडून समजते.
Q400 विमानांमध्ये अशा घटना क्वचितच घडतात. मात्र यामुळे एकदा पुन्हा विमानांच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होतो. गेल्या काही महिन्यांत भारतातील काही विमान कंपन्यांबाबत देखभाल आणि सुरक्षा प्रक्रियांवरील प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत.
अहमदाबाद विमान अपघातानंतर विमान प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटना सातत्याने समोर येत आहेत.
SpiceJet plane window frame falls off in mid-air, causing chaos among passengers, plane claimed to be safe
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी