विशेष प्रतिनिधी
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील आमदार आणि मंत्र्यांनी कोणतेही वादग्रस्त किंवा भडक विधान करून विरोधकांच्या हातात आयते कोलित देऊ नये, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ताकीद दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा धक्क्यात येऊ शकते, त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे बुधवारी रात्री महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीसांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाळी अधिवेशनात सर्वांनी एकत्र आणि संयमित भूमिका घेण्याचे आवाहन केले. Devendra Fadnavis
फडणवीसांनी सांगितले की, “महायुतीत अंतर्गत वाद असतील, तर ते घरातच सोडवा. अशा वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांना सरकारवर टीकेची संधी मिळते आणि अधिवेशनाचे मुख्य मुद्दे बाजूला पडतात.” यासोबतच, अधिवेशन काळात सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि कामे मार्गी लावा, असेही ते म्हणाले.
फडणवीसांनी सोशल मीडियाच्या वापराबाबतही मार्गदर्शन केले. “सरकारची कामगिरी अधिक प्रभावीपणे सोशल मीडियावर मांडावी. विरोधकांकडून फेकन्यूज पसरवली जात असल्याने प्रतिपक्षाच्या प्रचाराचा मुकाबला माहिती व सत्याच्या आधारे करा,” असे ते म्हणाले.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले. पक्ष पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी गटनिहाय नियोजन करावे, असे निर्देश मिळाले.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुती समन्वय समितीची बैठकही पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते. बैठकीत ठाकरे गटाच्या ‘विजयी जल्लोष मेळाव्या’वरही चर्चा झाली. तसेच आगामी अधिवेशनात महायुतीची एकसंघ भूमिका आणि रणनीती यावरही चर्चा करण्यात आली.
Don’t give the baton to the opposition; Chief Minister’s stern warning to those making controversial statements
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी