विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरणानंतर (Covid vaccination) युवकांमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. “लसीमुळे मृत्यू झाला”, “तरुणांचा मृत्यू लसीकरणामुळे होत आहे” अशा बातम्या आणि पोस्टमुळे जनतेमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, देशातील दोन सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था असलेल्या AIIMS (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणि ICMR (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) या अफवांना खोडून काढले आहे. शास्त्रीय अभ्यासातून कोविड लसीकरण आणि हृदयविकाराच्या आकस्मिक मृत्यू यामध्ये कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ICMR आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांनी संयुक्तपणे १८ ते ४५ वयोगटातील युवकांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास केला. देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ४७ तृतीय श्रेणी रुग्णालयांमध्ये हा सर्वेक्षण व अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात आढळून आले की अशा मृत्यूंमागे प्रामुख्याने अनुवंशिक दोष, पूर्वीपासून असलेले आजार, आणि अनियमित जीवनशैली ही कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये पोस्ट-कोविड गुंतागुंत कारणीभूत होती, मात्र कोणत्याही प्रकरणात लसीकरणाशी (Covid vaccination) थेट संबंध आढळून आला नाही.
दरम्यान, AIIMS नेही ICMR च्या सहकार्याने स्वतंत्र अभ्यास केला आहे. काही व्यक्तींमध्ये आधीच असलेल्या हृदयविकारांचा किंवा अनुवंशिक कारणांचा धोका होता, काहींमध्ये मद्यपान, धूम्रपान, व्यायामाचा अतिरेक, आणि झोपेच्या कमतरतेसारख्या कारणांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, “कोविड लसीकरणामुळे मृत्यू होतो” अशा प्रकारचे दावे अवैज्ञानिक, भ्रामक आणि समाजात भीती पसरवणारे आहेत. भारतात वापरल्या गेलेल्या लसी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे जागतिक आरोग्य संस्थांनीही मान्य केले आहे.
ICMR च्या माहितीनुसार, लसीकरणामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम हे अत्यंत दुर्मीळ (extremely rare) असून, आकस्मिक मृत्यू आणि लसीकरण यामधील संबंधाचा कोणताही शास्त्रीय पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही.
आरोग्य तज्ज्ञांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका, वैज्ञानिक माहितीवरच आधारित निर्णय घ्या. लसीकरणामुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे लस घेणे हे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
The risk of heart disease due to Covid vaccination is just a rumor, scientific study has clarified
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी