विशेष प्रतिनिधी
मुंबई: MNS मराठीमध्ये बोलण्यास विरोध केला म्हणून मीरा रोड येथील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यापाराला चोप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदर शहरातील व्यापाऱ्यांकडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत तसेच या व्यापाऱ्यांकडून आक्रमक होत आंदोलन देखील करण्यात आले आहे.MNS
भविष्यामध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन इतर कोणासोबतही अस घडू शकतं, अशी चिंता व्यक्त करत व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट होत दुकाने बंद ठेवत आंदोलनाला सुरवात केली.
या घटनेच्या पार्श्वभुमीवर व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेत सेवेन स्कूल, मिरा रोड येथून पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण झाले आहे. या घटनेसंदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अविनाश जाधव काय बोलणार, हे आता महत्त्वाचे आहे. याप्रकरणात मनसेकडून काय उत्तर येणार हे दखील महत्त्वाचे आहे. या घटनेमुळे मनसे विरुद्ध व्यापारी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता. हा दुकान मालक मराठी बोलणार नाही असं बोलला असता संतापलेल्या मनसेचे कार्यकर्त्यांनी दुकान मालकाच्या कानाखाली वाजवत चोप दिला.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Nonmarathi businessman aggressive against MNS after shop owner was beaten up
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी