विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने (AIMIM) महाआघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिहारमधील एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहून एआयएमआयएमला काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांच्या आघाडीत सामील करून घेण्याची विनंती केली आहे. Lalu Prasad Yadav
३ जुलै २०२५ रोजी लिहिलेल्या पत्रात अख्तरुल इमान यांनी म्हटले आहे की, ” एआयएमआयएम २०१५ पासून बिहारच्या राजकारणात सक्रिय आहे. आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहोत की धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये. हे सत्य आहे की, जेव्हा धर्मनिरपेक्ष मतं विभागली जातात, तेव्हा सांप्रदायिक शक्तींना सत्तेत येण्याची संधी मिळते.”लोकसभा निवडणुकीपूर्वीही आम्ही महाआघाडीत सामील होण्याचा प्रयत्न केला होता, पण आमची मागणी फेटाळण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीसारख्या निर्णायक टप्प्यावर Lalu Prasad Yadav
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
एआयएमआयएमचा पुन्हा एकदा महाआघाडीत सहभागी होण्यास उत्सुक आहे.जर आपण सर्वजण मिळून ही निवडणूक लढवली, तर धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळता येईल आणि महाआघाडीचे सरकार सत्तेत येईल, याची मला खात्री आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यांनी लालूप्रसाद यादव यांना यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
बिहारच्या मागील विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने सीमांचल भागात चांगली मात्र मिळविली होती आणि काही जागांवर विजयही मिळवला होता. मात्र, त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार पराभूत झाले आणि भाजप-नीतीश कुमार यांची सत्ता आली, असा आरोप काँग्रेस आणि आरजेडीकडून करण्यात आला होता.
AIMIM जर महाआघाडीत सामील झाली, तर विशेषतः मुस्लिम बहुल भागात महाआघाडीची पकड अधिक मजबूत होऊ शकते. मात्र, या निर्णयामुळे काँग्रेस किंवा डाव्या पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. AIMIM वर नेहमीच भाजपची बी टीम म्हणून टीका होत आली आहे.
महाआघाडीच्या बैठकीत याबाबत लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यादव काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
AIMIM proposes to join grand alliance to avoid division of secular votes; Letter to Lalu Prasad Yadav
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी