Eknath Shinde “जय गुजरात” घोषणेवरून एकनाथ शिंदेंवर टीकेचा भडिमार; ठाकरे गट आणि विरोधकांचा हल्लाबोल

Eknath Shinde “जय गुजरात” घोषणेवरून एकनाथ शिंदेंवर टीकेचा भडिमार; ठाकरे गट आणि विरोधकांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात सध्या मराठी अस्मितेवरून वातावरण तापलेले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात “जय गुजरात” अशी घोषणा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठी-हिंदी भाषावाद आणि स्थानिक अस्मितेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाल्याने, शिंदेंवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना ठाकरे गटासह अनेक विरोधी पक्षांनी या घटनेवरून शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. Eknath Shinde

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात कोंढवा परिसरात उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात ते सहभागी झाले. कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी “धन्यवाद, जय महाराष्ट्र” असे म्हणत भाषण पूर्ण केले. मात्र, त्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांनी अचानक “जय गुजरात” अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये क्षणभर आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. Eknath Shinde



कार्यक्रमात शिंदेंनी अमित शाह यांच्यावर स्तुतिसुमने उधळत एक शेरही ऐकवला: “आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है.”

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला याचं काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्रविरोधी निर्णय घेऊन एकनाथ शिंदेंनी राज्याच्या अस्मितेचा सौदा दिल्लीश्वरांच्या चरणांशी केला आणि त्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाचं बक्षीस मिळालं. आता हेच बक्षीस टिकवण्यासाठी केंद्राशी पूर्ण लाचारपणाने वागण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.”

Eknath Shinde comes under fire for his “Jai Gujarat” slogan; Thackeray group and opposition attack

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023