विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कथित हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्याबद्दल विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रेम पुतना मावशीचे असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
त भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या जीआरची होळी करण्याचा आदेश दिला आहे. मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचं मराठी प्रेम म्हणायचं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही?
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्षे सत्तेवर होती. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या १५ वर्षात ४०० वरून २८० पर्यंत खाली आली. याच शाळांतील विद्यार्थी संख्याही लाखांहून ३५ हजारांवर आली. काही शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुठे गेलं उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम? असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे.
शरद पवार गटाने २०२० मध्ये हिंदी भाषा जोडो अभियान केले होते, त्याचं उद्धाटन जयंत पाटील यांनी केले होते. आता ते हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होत आहेत, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लगावला आहे.
Uddhav Thackeray’s Marathi love for his niece and nephew, BJP criticizes him
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी