विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी 105 हुतात्मे झाले. येथील मराठी मजूर, कामगार, गिरणी कामगारांच्या घामातून मुंबई तयारी झाली आहे. शेठजींच्या पैशाने मुंबई उभी राहिली नाही, हेही एकनाथ शिंदेंना माहित नसेल. तुम्ही मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अपमान केला आहे,Eknath Shinde
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कच्च मडकं आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी उपस्थित होते. फडणवीसांनी शिंदेंच्या जय गुजरात म्हणण्याचे समर्थन करत त्यांची पाठराखण केली. प्रत्येकाला मराठी बोलण्याची सक्ती करणे ही गुंडगिरी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही म्हटले. यावर संजय राऊत यांनी फडणवीसांच्या जन्माच्या आधीपासून महाराष्ट्रात शिवसेना आहे. शिवसेनेने मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी काम केले आहे. याला जर फडणवीस गुंडगिरी म्हणत असतील तर तर ही गुंडगिरी शिवसेना (ठाकरे) करत राहील. आज फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते मराठी माणसाच्या याच गुंडगिरीमुळे हेही त्यांनी ध्यानात घ्यावे, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचे समर्थन करताना, उद्धव ठाकरे यांनी देखील जय गुजरात म्हटल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री माध्यमांना दाखवला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कच्चं मडकं आहे. त्यांना हे देखील माहित नसेल की गुजरात आणि महाराष्ट्र एक होता. बडोद्यात गायकवाडांचे संस्थान होते. उद्धव ठाकरे हे अमित शहांच्या विनंतीवरुन गुजरातमध्ये गेले होते आणि त्यांनी तिथे जाऊन आधी जय महाराष्ट्र म्हटले आणि नंतर जय गुजरात म्हणाले. इंदूर आणि ग्वाल्हेर येथेही मराठी राज्य होते. फडणवीसांनीही लक्षात घ्यावे की पेशव्यांचे राज्य कुठपर्यंत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यातील मराठी माणसासमोर जय उत्तर प्रदेशच म्हणतील ते तिथे मराठी माणसे आहेत म्हणून जय महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतील का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
Eknath Shinde is the most crude person in the cabinet, Sanjay Raut criticizes Jai Gujarat slogan
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी