विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी, असे सूचक विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.Uddhav Thackeray
हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याबद्दल आयोजित विजय मिळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राजने उत्तम मांडणी केल्याने माझ्या भाषणाची काही गरज आहे, असे वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचे लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे याकडे सर्वांचे लक्ष आहे.मला कल्पना आहे की, आज अनेक बुवा, महाराज व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतोय, कोणी टाचण्या मारतोय, कोणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असेल. कोणी रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो. या सगळ्या भोंदूपणाविरोधात माझ्या आजोबांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी लढा दिला आहे आणि त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय आपण सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे असा आरोप करून उद्धव ठाकरे म्हणाले, मधल्या काळात त्यांनी सुरू केले होते की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व ही काही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? 1992-93 साली जे काही घडले, तेव्हा आमच्या शिवसैनिकांनी अमराठी माणसांना वाचवले.
उद्धव म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाषेच्या आधारावर गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तु्म्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू. पण हे सगळे राजकीय बाटगे. देवेंद्र फडणवीस यांचे आजचे हे विधान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी स. का. पाटील यांनी केलेले एक विधान मला आठवते.
दिल्लीत बसलेल्यांचे पाय चाटणाऱ्यांना मी बाटगे म्हणतोय. मुंबई आपण मराठी माणसांनी मिळवली. तेव्हाही तत्कालीन सत्ताधारी मुंबई मराठी माणसांना देण्यास तयार नव्हते. तेव्हाही मराठी माणूस एकजूट आला. आज ते मराठी असल्याचा दावा करतात. पण ते केवळ नावाने मराठी आहेत. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे आता तपासावे लागेल. स का पाटील बोलले होते, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळणार? झुकवल. वाकवल. गुडघ्यावर आणले. मराठी माणसांनी लढून आपल्या हक्काची मुंबई मिळवली, असे ते म्हणाले.
कशासाठी हा सगळा घोळ तुम्ही घालत आहात. काश्मीरमधील कलम 370 हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. तेव्हा यांनी एक निशाण, एक प्रधान, एक विधान ही घोषणा दिली होती. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असले पाहिजे. निशाणही एकच असले पाहिजे, ते म्हणजे आपला तिरंगा असला पाहिजे, भाजपचे भांडी पुसण्याचे फडके असू नये. हे फडके म्हणजे आपला राष्ट्रध्वज नाही. त्यांनी आता एक नवीन टुमणे काढले आहे, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे हळुवारपणे सगळे एकेक करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान… हे आम्हाला हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही समित्या लावा, हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही करू देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
We came together to stay together, Uddhav Thackeray’s suggestive statement regarding the MNS Thackeray group alliance
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी