Thackeray family : मराठीसाठी मेळावा की ‘ठाकरे कुटुंबियांचा स्नेहसोहळा’?

Thackeray family : मराठीसाठी मेळावा की ‘ठाकरे कुटुंबियांचा स्नेहसोहळा’?

Thackeray family

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Thackeray family हिंदी सक्तीचा आदेश सरकारने मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने जाहीर केलेल्या तथाकथित ‘मराठीसाठी मेळाव्या’चे वास्तव काहीसे वेगळेच दिसून आले. शनिवारी वरळी डोम येथे पार पडलेला हा मेळावा कमी ‘कौटुंबिक स्नेहसंमेलन’ जास्त वाटत होता, असा सूर राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.Thackeray family

मनसेने मेळाव्याच्या आधी स्पष्ट केलं होतं की कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा या मंचावर नसेल, तरी व्यासपीठावर संपूर्ण कार्यक्रमात ठाकरे कुटुंबाचाच प्रचंड प्रभाव जाणवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन गटात विभागले गेलेले ठाकरे कुटुंबीय एका व्यासपीठावर आले. या कार्यक्रमाचे रूपांतर ‘मराठी गौरव सोहळा’ऐवजी ‘ठाकरे कुटुंब पुनर्मिलन सोहळा’ असं झाल्यास वावगं ठरणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, नेत्या राखी जाधव, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट दिसले. शरद पवार यांनीही या सोहळ्याला हजर राहणे टाळले. मात्र जे नेते उपस्थित होते त्यांना विशेष मध्ये सोडा त्यांची दखलही घेतली गेली नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा अनुपस्थित राहण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या ‘शहाणपणाचा’ असल्याचे मत अनेकांनी मांडले. व्यासपीठावरून कोणत्या पक्षाच्या विचारांना आणि भूमिकेला स्थान मिळाले हे पाहता, पवारांचा निर्णय योग्य ठरल्याचे दिसून आले.

मेळाव्यात ठाकरे कुटुंबाने एकत्रित फोटोसेशनही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पारंपरिक साडीत तर आणि शर्मिला ठाकरे जांभळ्या रंगाच्या पैठणी ड्रेसमध्ये उपस्थित होत्या. दोन्ही घराण्यांची मुले आदित्य आणि अमित ठाकरे एकत्रित व्यासपीठावर खांद्यावर हात ठेवत स्टेजवर फिरताना दिसले. गेल्या काही वर्षांतील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा क्षण अनेकांना आश्चर्याचा वाटला. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी, मुलगे आदित्य व तेजस हे सर्वजण एकत्र उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोझ देताना दिसले.

मराठीसाठी संघटित होण्याचा हेतूमी घेतलेला मेळावा, प्रत्यक्षात ठाकरे बंधूंमध्ये सौहार्द निर्माण करणारा कौटुंबिक सोहळा ठरला. हे दृश्य भावनिक असले तरी, मराठीसाठी लढण्याचा गाभा आणि त्यासंबंधित गांभीर्य हरवल्याची टीका अनेकांकडून होत आहे.

A gathering for Marathi or a ‘Thackeray family’s reunion?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023