विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dada Bhuse शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी फक्त नागपूर विभागापुरती मर्यादीत न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याची तक्रार चाळीसगाव येथील खान्देश जन आंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना करण्यात आली होती. त्याची दखल घेत मंगळवारी पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाण्याची घोषणा केली.Dada Bhuse
नागपूर येथील बोगस शिक्षक भरतीची चौकशी चालू, असताना राज्यात इतर जिल्ह्यांमध्येदेखील २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला बंदी असताना संस्थाचालक, जि. प. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपसंचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे ७ मे रोजी दिलेल्या स्मरणपत्राद्वारे समितीने सांगितले होते. आज देखील राज्यभरातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती राजरोसपणे सुरू आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
संस्थाचालक व अधिकारी, कर्मचारी व वेतन अधीक्षकांच्या मदतीने बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अनेक संस्थाचालक, अधिकारी अडकणार शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता, अटी व शर्तीचे उल्लंघन करत लाखो रुपये घेत अनेक संस्थांचालकांनी शाळेत शिक्षक, कर्मचाऱ्यांची खोटी कागदपत्रे सादर करून शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळवित उपसंचालकांकडून बोगस पद्धतीने शालार्थ आयडी काढून घेतले. वेतन अधीक्षकांना हाताशी धरून पगार सुरू केले, असा आरोप करण्यात आला आहे.
Education Minister Dada Bhuse announces investigation into Shalarth ID scam through SIT
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti :