विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तमिळनाडूमध्ये असलेला हिंद द्वेष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम .के. स्टॅलिन यांचा हिंदी द्वेष्टेपणा सर्वश्रुत आहे. आता स्टॅलिन यांनी स्वतःबरोबर हिंदीद्वेष्टांच्या रांगेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बसवले आहे.
दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता व हिंदी लादण्या विरोधात एकत्र लढण्याची घोषणा केली. या घडामोडीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
स्टॅलिन म्हणाले, “हिंदी लादण्या विरोधात डीएमके व तमिळ जनतेने सुरू केलेली लढाई आता सीमारेषा ओलांडून महाराष्ट्रात वादळासारखी उसळत आहे. ठाकरे बंधूंच्या मुंबईतील एकत्र येण्याने आणि त्यांच्या भाषणांनी ही चळवळ आणखी बळकट झाली आहे. ही गोष्ट खूपच प्रेरणादायक आहे.”
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
स्टॅलिन यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. “हिंदी शिकल्याशिवाय निधी मिळणार नाही, असा दबाव टाकणाऱ्या भाजपने आता दुसऱ्यांदा माघार घेतली आहे. ही माघार महाराष्ट्रातील जनतेच्या संभाव्य उद्रेकामुळेच आहे. हिंदीसाठी मराठीतून विरोध झाला की भाजपची अराजक वृत्ती थोपवली जाते,” असा आरोप त्यांनी केला.
स्टॅलिन यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “हिंदी शिकल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांना महाराष्ट्रातील उठाव डोळे उघडणारा ठरेल. देशातील सर्व भाषांचा सन्मान राखला गेला पाहिजे. कुठल्याही एका भाषेला लादणे हे संविधानाच्या भावनेविरोधात आहे.”
मुंबईत भरलेल्या विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र दिसले. त्यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि हिंदी लादण्या विरोधात एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी भाषेच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत आणि यापुढेही मराठीसाठी एकत्र राहणार आहोत.”
राज ठाकरे म्हणाले, “भाषा ही अस्मितेची बाब आहे. कोणतीही भाषा लादली जाऊ शकत नाही. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. मराठीचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे.”
Stalin placed Raj and Uddhav Thackeray in the same row of Hindi haters as himself
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी