विशेष प्रतिनिधी
उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात रविवारी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मिरवणुकीतील काही सहभागी निषिद्ध मार्गावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका घोड्याच्या मदतीने पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडवर धडक देण्यात आली. बॅरिकेड कोसळून पाच पोलिस जखमी झाले.
ही घटना खजुरवाडी मशिदीच्या परिसरात घडली. पोलिसांनी अनेक वेळा सांगूनही आयोजकांनी घोडे घेऊन निषिद्ध मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा म्हणाले, मिरवणुकीचा मार्ग पूर्वीच निश्चित केला होता आणि आयोजकांना स्पष्टपणे निषिद्ध मार्गावरून घोडे नेण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी बॅरिकेडवर घोडा आदळवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.”
ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. त्या गोंधळात सहभागी लोकांनी घोडा तिथेच टाकून पलायन केले.
जीवाजिगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी विवेक कनोडिया यांनी सांगितले, मोहरम मिरवणुकीच्या आयोजकांसह १६ जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार दंगल, बेकायदेशीर जमावबंदी, व शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
Chaos during Muharram procession in Madhya Pradesh: Horses hit barricades, injuring police
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी